• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, July 23, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव: शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध; चर्चेनंतर मोजणी थांबवली, आमदार राणा पाटलांची ग्वाही

admin by admin
June 29, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
धाराशिव: शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध; चर्चेनंतर मोजणी थांबवली, आमदार राणा पाटलांची ग्वाही
0
SHARES
511
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी धाराशिव जिल्ह्यात होणाऱ्या भूसंपादनाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. “आम्ही आमच्या जमिनी देणार नाही,” अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्यानंतर सत्ताधारी पक्षाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी १९ गावांतील बाधित शेतकऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या तीव्र भावना आणि मागण्या लक्षात घेऊन, सध्या सुरू असलेली जमिनीची मोजणी अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार तात्काळ थांबवण्यात आली आहे. “शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय महायुती शासन कोणताही पुढील निर्णय घेणार नाही,” अशी स्पष्ट ग्वाही आमदार पाटील यांनी यावेळी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीत शेतकऱ्यांनी आपल्या विविध समस्या, शंका आणि मागण्या मोकळेपणाने मांडल्या. अनेक शेतकऱ्यांनी आपली जमीन कागदोपत्री ‘जिरायत’ असली तरी प्रत्यक्षात ती ‘बागायती’ म्हणून वापरली जात असल्याचे सांगितले. त्यामुळे मोबदला ठरवताना जमिनीचे स्वरूप ‘बागायती’ म्हणूनच विचारात घ्यावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. यावर आमदार पाटील यांनी योग्य ती पडताळणी करून असे क्षेत्र बागायतीच समजले जाईल, असे आश्वासन दिले.

तुळजापूर तालुक्यातील खुंटेवाडी गावातील सुमारे ८० टक्के शेतकरी या प्रकल्पामुळे भूमिहीन होणार असल्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. “जमिनी गेल्यावर आमचं भवितव्य काय?” असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या गंभीर विषयावर तोडगा काढण्यासाठी पुढील आठवड्यात मुंबईत संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन योग्य पर्याय काढण्याचे आश्वासन आमदार पाटील यांनी दिले. तसेच, बाधित शेतकऱ्यांना प्रचलित दराचा विचार करून न्याय्य मोबदला देण्याबाबत शासन सहानुभूतीने विचार करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘काहीजण राजकारण करत आहेत’ – आमदार पाटील

या विषयाचे काही लोक राजकारण करत असून, चुकीची माहिती पसरवून शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण करत आहेत, असा आरोप आमदार पाटील यांनी केला. शेतकऱ्यांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता, वास्तव माहिती घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. शेतकऱ्यांच्या सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (MSRDC) अधिकारी प्रत्यक्ष शेतकऱ्यांना भेटून त्यांच्या अडचणी जाणून घेतील आणि त्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

 

Previous Post

वाशी तालुक्यात धाडसी घरफोडी; बंद घराचे कुलूप तोडून अडीच लाखांचे दागिने लंपास

Next Post

उमरग्यात व्यापाऱ्याची लाखोंची फसवणूक; गुजरातला जाणारा तांदूळ परस्पर विकला, तिघांवर गुन्हा दाखल

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

उमरग्यात व्यापाऱ्याची लाखोंची फसवणूक; गुजरातला जाणारा तांदूळ परस्पर विकला, तिघांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

नीट पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ धाराशिवात कॅन्डल मार्च; आमदार कैलास पाटील यांचा सहभाग

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमाराच्या निषेधार्थ धाराशिवात कॅन्डल मार्च

July 23, 2026
तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव–बीड–छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गाला गती; सर्वेक्षणास मंजुरी, डीपीआरचे काम सुरू

July 23, 2026
काक्रंबा पाटीजवळ भीषण अपघात : टेम्पो पुलाच्या कठड्याला धडकला; चार वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू, सात जण जखमी

धाराशिवजवळ किया सोनेट कारचा भीषण अपघात! डिव्हायडरला धडकून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, एक जखमी

July 22, 2026
नीट पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ धाराशिवात कॅन्डल मार्च; आमदार कैलास पाटील यांचा सहभाग

नीट पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ धाराशिवात कॅन्डल मार्च; आमदार कैलास पाटील यांचा सहभाग

July 23, 2026
राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ धाराशिवात काँग्रेसचे आंदोलन

राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ धाराशिवात काँग्रेसचे आंदोलन

July 22, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!