• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, September 12, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

उमरग्यात व्यापाऱ्याची लाखोंची फसवणूक; गुजरातला जाणारा तांदूळ परस्पर विकला, तिघांवर गुन्हा दाखल

admin by admin
June 29, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

उमरगा –  येथील एमआयडीसीतील एका व्यापाऱ्याला गुजरातला पाठवलेला नऊ लाख ८४ हजार रुपयांचा तांदूळ परस्पर विकून फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडु शिवाजी कांबळे (रा. लातूर), अमोल उर्फ दिलीप काशिनाथ घुमनसुरे (रा. पद्मा नगर, लातूर) आणि काशिनाथ किसन बन (रा. गंगाधाम ट्रान्सपोर्ट बायपास रिंगरोड, खान कॉम्प्लेक्स, लातूर) अशी आरोपींची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी प्रकाशकुमार आप्तगीरी यांच्या मालकीच्या श्री लक्ष्मी नरसिंम्हा स्वामी ट्रेडर्स या उमरगा एमआयडीसीतील कंपनीतून २१ मे २०२५ रोजी ‘एमएच २५ एयु ९०९२’ या ट्रकमध्ये तांदळाची ५० किलो वजनाची ७०६ पोती (एकूण ३५ टन) भरण्यात आली होती. या तांदळाची एकूण किंमत ९ लाख ८४ हजार ८७० रुपये होती. हा माल गुजरातमधील सानंद येथील रतन ऍग्रो कंपनीत पोहोचवायचा होता.

आरोपींनी संगनमत करून कट रचला. त्यांनी गुजरातमधील रतन ऍग्रो कंपनीत फक्त ६ लाख ९७ हजार ५०० रुपयांचा माल उतरवला. उर्वरित २ लाख ८७ हजार ३७० रुपये किमतीचा सुमारे १० टन ३ क्विंटल वजनाचा तांदूळ (२०६ पोती) गाडीच्या सेन्सरमध्ये बिघाड झाल्याचे कारण सांगून कंपनीबाहेर काढला. त्यानंतर या मालाची परस्पर विल्हेवाट लावून आरोपींनी अपहार केला आणि व्यापाऱ्याची फसवणूक केली.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर प्रकाशकुमार आप्तगीरी यांनी २८ जून २०२५ रोजी उमरगा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१६(२), आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Previous Post

धाराशिव: शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध; चर्चेनंतर मोजणी थांबवली, आमदार राणा पाटलांची ग्वाही

Next Post

शेतीच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील तिघांवर गुन्हा दाखल

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

शेतीच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील तिघांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

प्रथमेश देशमुख कुटुंबीयांची आ. रोहित पवारांकडून सांत्वनपर भेट

प्रथमेश देशमुख कुटुंबीयांची आ. रोहित पवारांकडून सांत्वनपर भेट

September 12, 2026
‘एसआयटी’ नको; एमपीएससी गैरप्रकारांची न्यायालयीन चौकशी करा

‘एसआयटी’ नको; एमपीएससी गैरप्रकारांची न्यायालयीन चौकशी करा

September 11, 2026
आमदार राणाजगजितसिंह पाटील : मंत्रिपदाचं स्वप्न आणि ‘मित्र’ची भेट !

‘देवाभाऊंनी आदेश दिले’, पण जीआर कुठेय? राणा पाटलांची फेसबुक पोस्ट म्हणजे निव्वळ हवेतील गोळीबार; आदेश दाखवण्याचं खुलं आव्हान!

September 11, 2026
बापाची ४० वर्षांची ‘पाणीदार’ स्क्रिप्ट, खिसेगरम युट्युबर्सची फौज अन् साहेबांचा ‘तो’ कोणता डिसेंबर?

बापाची ४० वर्षांची ‘पाणीदार’ स्क्रिप्ट, खिसेगरम युट्युबर्सची फौज अन् साहेबांचा ‘तो’ कोणता डिसेंबर?

September 10, 2026
पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

स्पर्धा परीक्षेची धग आणि दुष्काळाची झळ; खासापुरीच्या २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत

September 10, 2026

Recent Posts

  • प्रथमेश देशमुख कुटुंबीयांची आ. रोहित पवारांकडून सांत्वनपर भेट
  • ‘एसआयटी’ नको; एमपीएससी गैरप्रकारांची न्यायालयीन चौकशी करा
  • ‘देवाभाऊंनी आदेश दिले’, पण जीआर कुठेय? राणा पाटलांची फेसबुक पोस्ट म्हणजे निव्वळ हवेतील गोळीबार; आदेश दाखवण्याचं खुलं आव्हान!
  • बापाची ४० वर्षांची ‘पाणीदार’ स्क्रिप्ट, खिसेगरम युट्युबर्सची फौज अन् साहेबांचा ‘तो’ कोणता डिसेंबर?
  • स्पर्धा परीक्षेची धग आणि दुष्काळाची झळ; खासापुरीच्या २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!