शिराढोण : फिर्यादी नामे-राहुल रामराजे ओमने, वय 37 वर्षे, रा. शिवाजी नगर शिराढोन ता. कळंब जि. धाराशिव यांच्या राहाते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि.10.04.2024 रोजी 10.00 ते 14.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन घरातील कपाटातील ठेवलेले 50 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम 2,00,000₹ असा एकुण 2, 86, 400 ₹ किंमतीचा माल चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे राहुल ओमने यांनी दि.10.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो. ठाणे येथे 454, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी : फिर्यादी नामे- शांतीनाथ रामचंद्र कासार, वय 66 वर्षे, रा. कसबे तडवळे ता. जि. धाराशिव यांचे राहाते घराचा कडी कोंडा अज्ञात व्यक्तीने दि. 10.04.2024 रोजी 13.30 ते 16.30 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन घरातील कपाटातील ठेवलेले 90 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, असा एकुण 2, 14, 000 ₹ किंमतीचा माल चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे शांतीनाथ कासार यांनी दि.10.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे 454, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तामलवाडी : फिर्यादी नामे-पवन सिद्राम सलगर, वय 30 वर्षे, रा. कोरेवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांची अंदाजे 50,000 ₹ होंडा शाईन मोटरसायकल क्र एमएम 25 एव्ही 3341 ही दि. 03.04.2024 रोजी 11.00 ते दि. 04.04.2024 रोजी 04.00 वा. सु. पवन सलगर यांचे राहाते घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे पवन सलगर यांनी दि.10.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.