• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, October 10, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

पश्चिम लोहटा : ग्रामपंचायतीत रोजगार सेवकाच्या बाजूने हात वर केल्याने ग्रामस्थाला मारहाण; ८ जणांवर शिराढोण पोलिसांत गुन्हा दाखल

admin by admin
September 12, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

कळंब –  कळंब तालुक्यातील पश्चिम लोहटा ग्रामपंचायत कार्यालयात रोजगार सेवकाला मुदतवाढ देण्याबाबत घेतलेल्या निर्णयात बाजूने हात वर केल्याचा राग मनात धरून एका ५५ वर्षीय व्यक्तीला गैरकायद्याची मंडळी जमवून बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शिराढोण पोलीस ठाण्यात गावातील ८ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

पश्चिम लोहटा (ता. कळंब) येथील रहिवासी मधुकर रामराव आडसुळ (वय ५५ वर्षे) हे २५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजेच्या सुमारास गावातील ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित होते. यावेळी रोजगार सेवक गोविंद आश्रुबा सावंत यास कामावर कायम ठेवण्यात यावे, या विषयावर मधुकर आडसुळ यांनी बाजूने हात वर केला.

या गोष्टीचा राग मनात धरून गावातीलच विनोद सोमनाथ सावंत, अमोल आडसुळ, संभाजी जाधव, किरण आडसुळ, रोहन आडसुळ, सुमित आडसुळ, संजय आडसुळ आणि शंकर जाधव (सर्व रा. पश्चिम लोहटा) यांनी बेकायदेशीर जमाव जमवला. आरोपींनी मधुकर आडसुळ यांना अश्लील शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी तसेच दगडाने बेदम मारहाण करून जखमी केले आणि जीवे मारण्याची धमकी दिली.

शिराढोण पोलिसांत ८ जणांवर गुन्हा नोंद

उपचार घेतल्यानंतर मधुकर आडसुळ यांनी ११ सप्टेंबर २०२६ रोजी शिराढोण पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. त्यांच्या प्रथम खबरेवरून पोलिसांनी वरील आठही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), १८९(२), १९१(२) आणि १९० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिराढोण पोलीस करत आहेत.

Previous Post

भूम : १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने लावला बालविवाह; पीडिता गर्भवती, पतीसह नातेवाइकांवर पोक्सो अन् बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल

Next Post

हिंगळजवाडी : शेतातील गवत व झुडपे काढण्यावरून ७५ वर्षीय वृद्धावर कुऱ्हाड अन् खोऱ्याने प्राणघातक हल्ला; ५ जणांवर ढोकी पोलिसांत गुन्हा दाखल

Next Post
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

हिंगळजवाडी : शेतातील गवत व झुडपे काढण्यावरून ७५ वर्षीय वृद्धावर कुऱ्हाड अन् खोऱ्याने प्राणघातक हल्ला; ५ जणांवर ढोकी पोलिसांत गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

हासेगाव शिवार : चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच केला पत्नीचा निर्घृण खून

October 9, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

आळणीत जुन्या वादातून दोन गटांत रक्तरंजित राडा : तलवार, कोयता, चाकू व लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ले

October 8, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

धाराशिव : एसटी कार्यालयाच्या गेटजवळ ७८ वर्षीय वृद्धाला दगडाने व लाथाबुक्क्यांनी ठेचून मारले

October 7, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत वृद्धेचे १२ ग्रॅम सोने लंपास

October 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

कळंब तहसीलचे बनावट शिक्के मारून कोर्टात सादर केली खोटी संचिका; न्यायालयाची व शासनाची फसवणूक करणाऱ्या तेरखेडा येथील इसमावर गुन्हा दाखल

October 6, 2026

Recent Posts

  • हासेगाव शिवार : चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच केला पत्नीचा निर्घृण खून
  • आळणीत जुन्या वादातून दोन गटांत रक्तरंजित राडा : तलवार, कोयता, चाकू व लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ले
  • धाराशिव : एसटी कार्यालयाच्या गेटजवळ ७८ वर्षीय वृद्धाला दगडाने व लाथाबुक्क्यांनी ठेचून मारले
  • धाराशिव बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत वृद्धेचे १२ ग्रॅम सोने लंपास
  • कळंब तहसीलचे बनावट शिक्के मारून कोर्टात सादर केली खोटी संचिका; न्यायालयाची व शासनाची फसवणूक करणाऱ्या तेरखेडा येथील इसमावर गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!