• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, July 23, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

लाचखोर अधिकाऱ्याला बक्षीस ! शिरीष यादव यांच्याकडे अप्पर जिल्हाधिकारी पदाचा पदभार !!

admin by admin
November 30, 2024
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
धाराशिवच्या उपजिल्हाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
0
SHARES
4.5k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: धाराशिवचे उपजिल्हाधिकारी शिरीष यादव आणि त्यांच्या पत्नी प्रतीक्षा यादव यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB)पुण्यात गुन्हा दाखल केला आहे. उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जमवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. विशेष म्हणजे, अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतर यादव पुन्हा धाराशिवला रुजू झाले असून त्यांच्याकडे अतिरिक्त जिल्हाधिकारी पदाचा पदभार देण्यात आला आहे. यामुळे लाचखोर अधिकाऱ्याला शासनाने बक्षीस दिले आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

शिरीष यादव हे सध्या धाराशिवला निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी असून, विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर ते गायब झाले होते. निवडणूक संपताच, ते पुन्हा धाराशिवला जॉईन झाले असून, प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी पदाचा पदभार देण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण ?

पुण्यात झोपडपट्टी पुनर्वसन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी असताना यादव यांनी बेकायदेशीररित्या १ कोटी ३८ लाख ७४ हजार रुपये इतकी संपत्ती जमवली होती. ACB च्या गोपनीय चौकशीत यादव यांच्या पत्नीने खोटे प्रतिज्ञापत्र सादर केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर फसवणुकीचा आरोप देखील लावण्यात आला आहे.

९ वर्षांपूर्वी पुण्यातील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचा (एसआरए) उपमुख्य कार्यकारी अधिकारी असताना यादव यांना पाच लाखांची लाच घेताना ‘एसीबी’ने अटक केली होती. त्याच्या घराच्या झडतीत ५१ लाख रुपये रोख, २२ लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व पाच महागडे मोबाइल जप्त करण्यात आले होते.

यादव यांनी या संपत्तीबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे संपत्तीचा स्रोत उलगडण्यात एसीबीला अद्याप यश आलेले नाही. विविध बँकांत असलेल्या त्याच्या लॉकरमध्येही मोठ्या प्रमाणावर मौल्यवान ऐवज असण्याचा एसीबीला संशय आहे. त्याची तपासणी केली जात आहे. यादवच्या मोबाइलमध्ये एचडीएफसी, आयसीआयसीआय, स्टेट बँक ऑफ इंडियाचे जमा शिल्लक रकमेबाबत संदेश आहेत. यादवने विदेशातही दौरे केल्याची माहिती आहे. यापूर्वी पुणे मनपात बांधकाम टीडीआर घोटाळाप्रकरणी यादववर गुन्हा दाखल आहे. २००७ ते २०१२ दरम्यान त्याची उघड चौकशी केली असता त्याच्याकडे अडीच लाखांची अपसंपदा सापडली होती.

Previous Post

जिल्हाधिकारी डॉ. ओम्बासे दीर्घ प्रशिक्षणासाठी, पदभार डॉ. मैनाक घोष यांच्याकडे

Next Post

तानाजी सावंत यांना नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार का? राजकीय वर्तुळात चर्चा रंगली !

Next Post
तानाजी सावंत यांना नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार का? राजकीय वर्तुळात चर्चा रंगली !

तानाजी सावंत यांना नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार का? राजकीय वर्तुळात चर्चा रंगली !

ताज्या बातम्या

तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

धाराशिवच्या 139 गावांसाठी 10 कोटींचा निधी मंजूर; अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांचा विकास होणार

July 23, 2026
“खायला भरपूर जागा आहे!” जिल्हा परिषदेत ‘मल्टी-कुझिन’ बुफे; पण शाळकरी पोरांच्या नशिबी मात्र गळकी छत!

“खायला भरपूर जागा आहे!” जिल्हा परिषदेत ‘मल्टी-कुझिन’ बुफे; पण शाळकरी पोरांच्या नशिबी मात्र गळकी छत!

July 23, 2026
तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

पश्चिम महाराष्ट्रातील ५० टीएमसी पूरपाणी मराठवाड्यात वळविण्याच्या प्रकल्पाला गती

July 23, 2026
धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाच्या स्थापनेला गती; मुंबईच्या पथकाकडून प्रस्तावित जागेची पाहणी

धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाच्या स्थापनेला गती; मुंबईच्या पथकाकडून प्रस्तावित जागेची पाहणी

July 23, 2026
जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र निषेध

जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र निषेध

July 23, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!