• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, May 12, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तानाजी सावंत यांना नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार का? राजकीय वर्तुळात चर्चा रंगली !

admin by admin
November 30, 2024
in राजकारण
Reading Time: 1 min read
तानाजी सावंत यांना नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार का? राजकीय वर्तुळात चर्चा रंगली !
0
SHARES
1.2k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आठ दिवस उलटले तरी महायुतीकडून सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागण्याची शक्यता असून भाजपने काही मंत्र्यांच्या नावांवर आक्षेप घेतल्याची चर्चा सुरू आहे. विशेषतः तानाजी सावंत यांचा मंत्रिमंडळातील समावेश अनिश्‍चिततेच्या भोवऱ्यात अडकला आहे.

तानाजी सावंत हे राज्याचे माजी आरोग्यमंत्री आणि धाराशिवचे पालकमंत्री राहिलेले आहेत. त्यांच्या कार्यकाळात आरोग्य विभागात कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांनी त्यांची प्रतिमा मलीन झाली होती. अँब्युलन्स खरेदी घोटाळा, अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नती यांसारख्या प्रकरणांमध्ये भ्रष्टाचाराच्या तक्रारी केल्या गेल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप करत सावंत यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यामुळे भाजपकडून सावंत यांच्या मंत्रिमंडळातील पुनर्नियुक्तीवर आक्षेप घेतल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सावंत यांच्या बाजूने ठाम असल्याचे समजते. शिंदे यांनी आपल्यासोबत आलेल्या आमदार आणि खासदारांना नाराज होऊ दिलेले नाही. मात्र, भाजपच्या या भूमिकेमुळे सावंत यांचे भवितव्य अधांतरी राहिले आहे.

या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदे गट यांच्यातील समन्वय महत्त्वाचा ठरणार आहे. भाजपकडून सावंत यांच्यासह अब्दुल सत्तार, संजय राठोड आणि दीपक केसरकर यांच्या मंत्रिमंडळातील प्रवेशाला विरोध होत असल्याने शिंदे गटातील नाराजी वाढू शकते. महायुतीतील अंतर्गत तणाव कसा हाताळला जातो आणि सावंत यांना नव्या सरकारमध्ये स्थान मिळते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजप आणि शिंदे गट यांच्यातील चर्चेनंतरच सावंत यांचे राजकीय भवितव्य स्पष्ट होईल, पण सध्या तरी त्यांना नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळणे कठीण वाटत आहे.

Previous Post

लाचखोर अधिकाऱ्याला बक्षीस ! शिरीष यादव यांच्याकडे अप्पर जिल्हाधिकारी पदाचा पदभार !!

Next Post

ईव्हीएम वाद : परंडा मतदारसंघात फेर मतमोजणीची मागणी, राहुल मोटे मैदानात

Next Post
परंडा विधानसभा निवडणुकीत तानाजी सावंत आणि राहुल मोटे यांच्यात चुरशीचा सामना

ईव्हीएम वाद : परंडा मतदारसंघात फेर मतमोजणीची मागणी, राहुल मोटे मैदानात

ताज्या बातम्या

ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

सासूकडून २० लाख आणण्यासाठी तरुणाचे भरदिवसा अपहरण; चाकूसह टॉमीने बेदम मारहाण, कळंबमध्ये तिघांवर गुन्हा दाखल

May 12, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

पार्डी फाट्यावर दारूच्या नशेत रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत दहशत; पुण्यातील तरुणावर वाशी पोलिसांत गुन्हा दाखल

May 12, 2026
कळंब : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला गरोदर करणाऱ्या नराधमास २० वर्षांची सक्तमजुरी

कळंब : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला गरोदर करणाऱ्या नराधमास २० वर्षांची सक्तमजुरी

May 12, 2026
आरोग्य विभागाचा सर्वात मोठा ‘सर्जिकल स्ट्राईक’; संवर्ग बदलून नियुक्ती मिळवणाऱ्या डॉक्टरांना दणका

आरोग्य विभागाचा सर्वात मोठा ‘सर्जिकल स्ट्राईक’; संवर्ग बदलून नियुक्ती मिळवणाऱ्या डॉक्टरांना दणका

May 12, 2026
कळंब तहसीलदारांच्या वाहन चालकांने साहेबाच्या नावावर आठ हजार लाच घेतली

स्पा सेंटर सुरू ठेवण्यासाठी ३६ हजारांची लाच घेताना कळंबचा पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात; दुसरा फरार

May 12, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group