धाराशिव: येथील श्री सिद्धिविनायक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सभासद, ठेवीदार आणि मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली. या सभेत संस्थेच्या शेअर्सवर सभासदांना तब्बल १३ टक्के लाभांश देण्याची महत्त्वाची घोषणा संस्थेचे चेअरमन दिनेश कुलकर्णी यांनी केली. या निर्णयामुळे सर्व सभासदांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.
सभेला प्रमुख पाहुण्या म्हणून धाराशिवच्या नगराध्यक्षा सौ. नेहाताई राहुल काकडे उपस्थित होत्या. सभेदरम्यान संस्थेच्या ठेवी, कर्ज व्यवहार, एनपीए नियंत्रण यांसह विविध आर्थिक विषयांवर सविस्तर चर्चा होऊन सर्व विषयांचे ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.

भाजप जिल्हाध्यक्ष तथा संस्थेचे संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना संस्थेच्या १५ वर्षांच्या यशस्वी प्रवासाचा आलेख मांडला. “सहकार क्षेत्र हे केवळ नफ्या-तोट्यापुरते मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकी, रोजगारनिर्मिती आणि सर्वसामान्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाचे प्रभावी माध्यम बनले पाहिजे,” अशी भूमिका त्यांनी मांडली. पारदर्शक कारभार आणि ग्राहकाभिमुख सेवेच्या जोरावर संस्था भविष्यातही यशाचा हा ठसा कायम राखेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या सभेला श्रीमती मीनाताई कुलकर्णी, सौ. प्रतिभा काळे, सौ. दिपाली कुलकर्णी, नितीन भोसले, मधुकर जाधव, बालाजी कोरे, जि.प. समाजकल्याण सभापती विश्वास कोकणे, प्रविण पाठक, राहुल काकडे, सुजित साळुंके, शिवाजी गिड्डे, दाजी आप्पा पवार, अभिजीत काकडे, प्रतिक देवळे, गणेश कामटे, राजकुमार जाधव, अरविंद गोरे, देविदास कुलकर्णी, रामचंद्र सारडे, सौ. राधिका तानवडे यांच्यासह संस्थेचे सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.






