• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, October 4, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

नळदुर्ग येथील श्री खंडोबाच्या वार्षिक यात्रेला १२ जानेवारीपासून प्रारंभ

admin by admin
January 2, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
अणदूर येथे श्री खंडोबाची यात्रा २ डिसेंबर रोजी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

नळदुर्ग: महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मैलारपूर (नळदुर्ग) येथील श्री खंडोबाच्या वार्षिक यात्रा महोत्सवास १२ जानेवारी (रविवार) रोजी प्रारंभ होत आहे. या यात्रोत्सवादरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यात्रेची जय्यत पूर्वतयारी सुरू आहे. या महायात्रेस किमान पाच लाख भाविक हजेरी लावतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

श्री खंडोबा हे महादेवाचे अवतार असून महाराष्ट्रात श्री खंडोबाची एकूण आठ प्रमुख तीर्थक्षेत्र आहेत. त्यातील मैलारपूर (नळदुर्ग) हे दुसरे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. नळ राजाची पत्नी दमयंती हिच्या भक्तीमुळे श्री खंडोबा नळदुर्गात प्रकट झाले. तसेच दमयंती राणीच्या भक्तीमुळे श्री खंडोबाने बाणाईस चंदनपूराहून नळदुर्गात आणून विवाह केला व नंतर जेजुरीकडे प्रस्थान केले, अशी आख्यायिका आहे.

श्री खंडोबाची अणदूर आणि नळदुर्गमध्ये दोन वेगवेगळी मंदिरे असून मूर्ती मात्र एकच आहे. अणदूरमध्ये सव्वा दहा महिने व नळदुर्गमध्ये पावणेदोन महिने श्री खंडोबाची मूर्ती ठेवण्याची परंपरा हजारो वर्षांपासून सुरू आहे. अणदूरहून नळदुर्गला आणि नळदुर्गहून अणदूरला मूर्ती नेताना दोन्ही गावातील मानकऱ्यात देवाचा करार केला जातो. देवाचा करार करण्याची प्रथा महाराष्ट्रात फक्त या ठिकाणी चालते, हे विशेष.

मूर्ती अणदूर येथून नळदुर्गला आणल्यानंतर यात्रोत्सव सुरू होतो. दर रविवारी भाविक भक्त देवाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने गर्दी करतात. त्यास खेटे असे संबोधले जाते. पौष पौर्णिमा महायात्रा संपल्यानंतर अष्टमी करून नवमीला मूर्ती अणदूरला नेण्यात येते.

१३ जानेवारी हा यात्रेचा मुख्य दिवस

नळदुर्गची महायात्रा पौष पौर्णिमेला भरते. महायात्रा १२ जानेवारी रोजी सुरू होणार असून, १३ जानेवारी हा यात्रेचा मुख्य दिवस आहे. सोमवारी (दि. १३) पहाटे ४ वाजता काकडा आरती झाल्यानंतर श्री खंडोबाच्या मूर्तीवर अभिषेक करून अभ्यंगस्नान घालण्यात येणार आहे. त्यानंतर महावस्त्र अलंकार पूजा करून महानैवेद्य दाखविण्यात येणार आहे. दिवसभर भंडारा व खोबरे उधळणे, विविध गावाहून आलेल्या नंदीध्वजाची मिरवणूक, लहान मुलांचे जावळ काढणे, तळी भांडार उचलणे आदी धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. रात्री १२ वाजता अणदूर आणि नळदुर्गच्या मानाच्या काठ्यांचे व अणदूरहून आलेल्या घोड्यांचे आगमन होणार आहे. याचवेळी रंगीबेरंगी शोभेच्या दारूची आतषबाजी करण्यात येणार आहे. मध्यरात्री २ वाजता मंदिरात अणदूर व नळदुर्गच्या मानकऱ्यांचा सत्कार करण्यात आल्यानंतर पहाटे ३ वाजता श्रीची छबिना मिरवणूक निघणार आहे. मंगळवारी (दि. १४) दुपारी २ ते सायंकाळी ७ वाजता जंगी कुस्ती स्पर्धा होऊन यात्रेची सांगता होणार आहे.

यात्रेची जय्यत तयारी सुरू

यात्रेनिमित्त श्री खंडोबा मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली असून, भाविकांना रांगेत दर्शन घेता यावे यासाठी दर्शन बारी तयार करण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याची मुबलक व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच यात्रा शांततेत आणि सुरळीत पार पडण्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

Previous Post

धाराशिव जिल्ह्यात घरफोड्यांत वाढ , लाखो रुपयांचा ऐवज चोरीस

Next Post

जवळगा मेसाई सरपंचांवरील हल्ला बनावटीचा

Next Post
तुळजापूर तालुक्यातील जवळगा गावात सरपंचावर जीवघेणा हल्ला

जवळगा मेसाई सरपंचांवरील हल्ला बनावटीचा

ताज्या बातम्या

खरीप २०२० पीक विमा: प्रशासकीय दिरंगाईने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत; १४ ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी

खरीप २०२० पीक विमा: प्रशासकीय दिरंगाईने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत; १४ ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी

October 3, 2026
धाराशिव जिल्ह्यात भीषण कोरडा दुष्काळ; हक्काच्या पीक विम्याचे कोट्यवधी रुपये अडकल्याने बळीराजा संकटात

कागदपत्रांची अट न ठेवता पिकांचे सरसकट १०० टक्के पंचनामे करा

October 2, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : शिवाजी चौकातील किराणा दुकानासमोरून ३२ वर्षीय तरुण बेपत्ता; अज्ञाताने अपहरण केल्याचा संशय, शहर पोलिसांत गुन्हा दाखल

October 2, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना; कॉपर वायर, दोन दुचाकींसह अंगणवाडीतील साहित्य लंपास

October 2, 2026
तेरखेडा हायवेवर १९ वर्षीय तरुणाला चिरडून पळून जाणारा टेम्पोचालक जेरबंद

तेरखेडा हायवेवर १९ वर्षीय तरुणाला चिरडून पळून जाणारा टेम्पोचालक जेरबंद

October 2, 2026

Recent Posts

  • खरीप २०२० पीक विमा: प्रशासकीय दिरंगाईने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत; १४ ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी
  • कागदपत्रांची अट न ठेवता पिकांचे सरसकट १०० टक्के पंचनामे करा
  • धाराशिव : शिवाजी चौकातील किराणा दुकानासमोरून ३२ वर्षीय तरुण बेपत्ता; अज्ञाताने अपहरण केल्याचा संशय, शहर पोलिसांत गुन्हा दाखल
  • धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना; कॉपर वायर, दोन दुचाकींसह अंगणवाडीतील साहित्य लंपास
  • तेरखेडा हायवेवर १९ वर्षीय तरुणाला चिरडून पळून जाणारा टेम्पोचालक जेरबंद
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!