धाराशिव – जिल्हयातून भारत सरकारच्या भारत परीमाला योजने अंतर्गत सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग प्रस्तावित आहे. सदर महामार्गाचे सर्वेक्षणाचे काम पुर्ण झाले असून सदर महामार्ग भुसंपादन प्रक्रिया सुरु आहे. शेतकऱ्यांचे भुसंपादित प्रकरणा संदर्भात काही तक्रारी व समस्या असून सदर तक्रारी निवारण करण्याच्या संदर्भामध्ये नियोजन विभागाचे सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे शेतकरी व अधिकारी परीसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
धाराशिव जिल्हयातून सुरत-चेन्नई हा महामार्ग जात असून सदर महामार्गाकरीता जमीन संपादित करण्यात आली आहे. सदर महामार्ग हा केंद्र सरकारचा महत्वकांक्षी असलेल्या भारत परीमाला योजनेचा भाग असून पश्चिम – दक्षीण भारतामध्ये थेट संपर्क निर्माण करुन दळणवळण सोईस्कर करण्याच्या उद्देशाने सदर महामार्गाची निर्मीती करण्यात येणारआहे. सदर महामार्गाकरीता संपादित केलेली जमीन ही राज्य शासनाच्या सक्तीच्या भुसंपादन कायद्यांतर्गत भुसंपादित करण्यात येत असून सदर भुसंपादनाच्या संदर्भाने शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर व भुसंपादन प्रक्रीया सुरळीत होणेकरीता अधिकारी, शेतकरी यांच्या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जिल्हयातील अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या त्या तक्रारींचा निवारण करुन सुरत- चेन्नई महामार्ग करीता संपादित केलेल्या जमीनीचा मावेजा महाराष्ट्रातील समृध्दी महामार्गाप्रमाणे देणे बाबत शेतकऱ्यांकडून थेट खरेदीचे प्रस्ताव व संमती देण्याबाबतच्या सुचना करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांनी सदर भुसंपादित जमीनीचा मावेजा थेट खरेदी व्दारे देणे बाबत मागणी केली आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांच्या भुसंपादनासंबंधी तक्रारी आहेत असे शेतकऱ्यांचे पुर्नसर्वेक्षण करुन पंचनामे करणेबाबत सुचना केली. बागायती जमीनीमध्ये जलसिंचनाचे स्त्रोत जसे विहीर, बोअरवेल, पाईपलाईन आदी पंचनाम्यात ग्राहय धरुन मावेजा देणे बाबत तरतुद करावी. तसेच शेतीमधील फळझाडे, सागवान, चंदन आदी झाडांचा मावेजा देणेबाबत सुचना करण्यात आली.
ज्या शेतकऱ्यांच्या मध्य भागातून सदर महामार्ग प्रस्तावित आहे अशा शेतकऱ्यांना महामार्गावरती ॲक्सेस देवून ज्या शेतकऱ्यांचे क्षेत्रफळ कमी नोंदवले गेले आहे आशा शेतकऱ्यांचे शेतीचे पुर्नसर्वेक्षण करुन क्षेत्रफळ दुरुस्त करावे, आशा सुचना भुसंपादन विभागास स्विकारण्यात आल्या.
सदर परीसंवादास धाराशिव- कळंब चे आमदार कैलास घाडगे पाटील माजी नगराध्यक्ष नंदुभैय्या राजेनिंबाळकर, जिल्हाधिकारी ओंबासे साहेब, उपविभागीय अधिकारी खरमाटे, अधिक्षक कृषी अधिकारी श्री. माने, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक कदम साहेब, आदीसह अनेक अधिकारी व जिल्ह्यातील शेतकरी बांधाव मोठया प्रमाणात उपस्थीत होते.