तामलवाडी : आरोपी नामे- राजेंद्र तुकाराम गाटे,रा. दहीवाडी, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचा प्याजो रिक्षा क्र एमएच 13 सी.टी 8907 मध्ये प्रवाशी मयत नामे- मंगल प्रकाश चव्हाण, वय 57 वर्षे, रा. पांगरधवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव ह्या व त्यांची बहिण व मुलगी असे नमुद प्याजो रिक्षातुन दि. 20.12.2023 रोजी दुपारी 14.00 वा. सु. पांगरधरवाडी येथे सांगवी काटी जाणारे रोडवर सदगुरु बैठकीचे खोलीचे समोरुन जात होते.
दरम्यान नमुद आरोपीने त्यांचे ताब्यातील प्याजो रिक्षा हा हायगई व निष्काळजीपणे चालवून रिक्षा रोडच्या बाजूच्या खड्यात पल्टी होवून अपघात झाला. या अपघातात मंगल चव्हाण या गंभीर जखमी होवून उपचार दरम्यान मयत झाल्या. तर त्यांची बहिण व मुलगी गंभीर व किरकोळ जखमी झाले. अशा मजकुराच्या मयताचा मुलगा फिर्यादी नामे- नागनाथ प्रकाश चव्हाण, वय 42 वर्षे, रा. पांगरधरवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.17.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, ,337, 338, 304(अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद
कळंब : आरोपी नामे-1)गणेश उत्रेश्वर जाधव, वय 32 वर्षे, रा. लोहाटा पश्चिम ता. कळंब जि.धाराशिव हे दि.18.01.2024 रोजी 12.30 वा. सु. आपल्या ताब्यातील महिंद्रा ॲपे मोडेल क्र एमएच 25 एम 0618 हा अण्णाभाउ साठे चौक कळंब येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना कळंब पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.द.वि. स. कलम 283 अन्वये कळंब पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.