तामलवाडी : आरोपी नामे-लक्ष्मण गुंडीबा साळवे, मंथन केदारी साळवे, उत्कर्ष लक्ष्मण साळवे, केदारी गुंडीबा साळवे, ज्ञानेश्वर आण्णासाहेब साळवे, रामा धोंडीबा साळवे, सर्व रा. मसला खुर्द ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.10.06.2024 रोजी 18.00 वा. सु. मसला खु येथे फिर्यादी नामे- सिंधु संजय शिंदे, वय 50 वर्षे, रा. मसला खुर्द ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना व त्यांचा मुलगा निवृत्ती शिंदे यांना घरासमोर चारी खोदण्याचे कारणावरुन नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉड, सत्तुर काठीने मारहाण करुन जखमी केले. व खिशातील 2,700₹ काढून घेवून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सिंधु शिंदे यांनी दि. 11.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 143, 145, 147, 148, 149 327, 324, 323, 504, 506 सह 135 म.पो.का. 1951 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर : आरोपी नामे-किरण शिंदे, राजेश्री केदारी शिंदे, रा. झोपडपट्टी सिंदफळ ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 09.06.2024 रोजी 11.10 वा. सु. सिंदफळ शिवारात शेत गट नं 415/1 मध्ये फिर्यादी नामे- दयानंद लक्ष्मण शिंदे, वय 31 वर्षे, रा. झोपडपट्टी सिंदफळ ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी पावसाचे पाणी शेतात आल्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, कुह्राडीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- दयानंद शिंदे यांनी दि. 11.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 326, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.