येरमाळा – तेरखेडा शिवारातील शेत गट क्रमांक १२२६ मध्ये अतिक्रमण करून कंपाउंड पाडल्याप्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माणिकचंद चंदुलाल बोराण (वय ७६ वर्षे, रा. तेरखेडा, ता. वाशी, जि. धाराशिव) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शांतिलिंग रंगनाथ कुंभार, विनोद सिध्दलिंग कुंभार, गौतम रंगनाथ कुंभार, अविनाश शांतिलिंग कुंभार, पृथ्वीराज शांतिलिंग कुंभार आणि रमेश सिध्दलिंग कुंभार या सहा आरोपींनी २५ जानेवारी २०२५ रोजी सकाळी साडेआठ वाजता त्यांच्या शेतात बेकायदेशीरपणे प्रवेश केला. आरोपींनी ३७०० फूट लांबीचे लोखंडी अँगल व लोखंडी जाळीचे कंपाउंड पाडून नुकसान केले. यामुळे बोराण यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
बोराण यांनी दिलेल्या तक्रारीवरून येरमाळा पोलीस ठाण्यात भादंवि कलम १९०, १८९(२), ३२४(४), (५), ३२९(३), ३४६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.