धाराशिव: प्रजासत्ताक दिनानिमित्त धाराशिव पोलीस दलातील निवडक अधिकारी आणि अंमलदारांचा सत्कार करण्यात आला. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते प्रशस्ती पत्र देऊन हा सत्कार करण्यात आला.
यावेळी सन्मानित होणाऱ्यांमध्ये श्रीमती अश्विनी शामराव भोसले (महिला पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे उमरगा), . जाकेर निसार खॉन पठाण (राखीव पोलीस निरीक्षक, पोलीस मुख्यालय धाराशिव) सुरेश बापुराव कासुळे (सहा. पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे सायबर), अमोल सुभाष मोरे (सहा. पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा), पोलीस हवालदार रवि बळीराम भागवत (पोलीस ठाणे तुळजापूर), पोलीस हवालदार नितीन पोतदार (बिदे, जिल्हा विशेष शाखा धाराशिव), शिवा दहीहांडे (पोलीस मुख्यालय धाराशिव), श्रीमती प्रज्ञा क्षिरसागर (महिला पोलीस नाईक, पोलीस ठाणे ढोकी) यांचा समावेश होता.
उल्लेखनीय कामगिरी:
- श्रीमती अश्विनी भोसले: अपहरण झालेल्या तीन अल्पवयीन मुलींना अवघ्या २५ मिनिटांत शोधून काढल्याबद्दल.
- जाकेर पठाण: वार्षिक गोळीबार सरावाचे उत्कृष्ट नियोजन, विधानसभा निवडणुकीतील बंदोबस्त आणि प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे यशस्वी आयोजन.
- सुरेश कासुळे: CEIR पोर्टलच्या माध्यमातून ३४३ गहाळ मोबाईल हस्तगत करून नागरिकांना परत केले. सायबर गुन्ह्यांमध्ये फसवणूक झालेल्या २४ लाख रुपये नागरिकांना परत मिळवून दिले.
- अमोल मोरे: अंबी येथील अनोळखी महिलेच्या खुनाचा गुन्हा उघडकीस आणला.
- रवि भागवत: तुळजाभवानी शरदीय नवरात्र उत्सवातील बंदोबस्ताचे उत्कृष्ट नियोजन.
- श्रीमती प्रज्ञा क्षिरसागर: पोलीस ठाणे ढोकी येथील मुद्देमाल कक्ष संगणकीकृत केला.
या कार्यक्रमास जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे, पोलीस अधीक्षक संजय जाधवअपर पोलीस अधीक्षक गौहर हसन इतर मान्यवर उपस्थित होते.