उमरगा – उमरगा तालुक्यातील भिकार सांगवी गावाजवळ काही एक कारण नसताना दोन तरुणांना मारहाण करण्यात आल्याची घटना २५ जानेवारी रोजी घडली. याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्तिक राजेंद्र धुळे (वय २०, रा. डिग्गी) आणि त्यांचा मित्र हे २५ जानेवारी रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास भिकार सांगवी गावाजवळून जात असताना गणेश मंमाळे, शिवराज सास्तुरे, राजकुमार तेलंग आणि एक अनोळखी इसम (सर्व रा. चिंचोली जहागीर) यांनी त्यांच्या मोटरसायकल आडवून शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांना लाथाबुक्यांनी, हंटरने आणि बेल्टने मारहाण करून जखमी केले.
या घटनेप्रकरणी कार्तिक धुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमरगा पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भादंवि कलम ११८(१), १२६(२), ११५(२), ३५२, ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.