उमरगा : आरोपी नामे-1)भैरव तुकाराम जाधव, 2) नौमान मैनुद्दीन वाउीकर, 3)सुलेमान मैनुदीन वाडीकर सर्व र. मुळज ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि. 23.04.2024 रोजी 19.00 वा. सु. मुळज येथे फिर्यादी नामे- मैनुद्दीन इस्माईल वाडीकर वय 55 वर्षे, र. मुळज ता. उमरगा जि. धाराशिव यांना व त्यांचा मुलगा सिकंदर व मुलगी फराना यांनाही नमुद आरोपींनी तुम्ही घेतलेल्या ट्रॅक्टरचा धंदा जास्त होत आहे या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, हंटर, काठी, बेल्टने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- मैनुद्दीन वाडीकर यांनी दि.24.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे 324, 323,504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
शिराढोण : आरोपी नामे-1)हाणुमंत प्रभाकर कानडे, 2)अभिजीत भाउसाहेब कानडे, 3) भाउसाहेब रामहारी कानडे, 4) प्रविण मारोती कानडे सर्व रा. हासेगाव ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि. 20.04.2024 रोजी 08.00 वा. सु. हासेगाव ता. कळंब जि. धाराशिव येथे फिर्यादी नामे-राजेंद्र नामदेव गाडेकर, वय 42 वर्षे, रा. हासेगाव ता. कळंब जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी सभेला माणसे घेवून जाण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी पाईप, बेल्ट, चप्पल, काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादीची आई भांडण सोडवण्यास आले असता त्यांनाही शिवीगाळ करुन लोखंडी पाईपने हातावर मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- राजेंद्र गाडेकर यांनी दि.24.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो. ठाणे येथे 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
अणदूरमध्ये चोरी
नळदुर्ग : फिर्यादी नामे-दिनेश शशिकांत मुळे, वय 31 वर्षे, रा. अणदुर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे शेतातील घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 21.04.2024 रोजी 21.00 ते दि. 22.04.2024 रोजी 03.30 वा. सु. तोडून आतमध्ये प्रवेश करुन 25 पोते सोयाबीन अंदाजे 52,500 ₹ किंमतीचे चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-दिनेश मुळे यांनी दि.24.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे 457, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.