धाराशिव जिल्ह्यात विविध ठिकाणी चार वेगवेगळ्या चोऱ्यांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात मालमत्ता लंपास केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एका व्यक्तीला मारहाण करून त्याच्याकडून पाच लाखांहून अधिक रुपये लुटण्यात आले तर दुसऱ्या घटनेत दुचाकी चोरीला गेली आहे. धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन घरांमध्ये चोरी झाली असून येरमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतीची अवजारे चोरीला गेल्याची घटना घडली आहे.
सोन्याच्या दागिन्यांवर हात
वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत लासुरगाव येथील राजेंद्र संगेकर यांना सोने विकण्याच्या बहाण्याने बोलावून घेऊन बप्पा नावाच्या आरोपीने त्याच्या साथीदारांसह मारहाण करून त्यांच्याकडील 5 लाख 20 हजार रुपये आणि मोबाइल फोन लुटून नेला. ही घटना 7 ऑक्टोबर रोजी घडली असून याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी नामे-राजेंद्र तुकाराम संगेकर, वय 56 वर्षे, रा. लासुरगाव ता. वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर यांना आरोपी नामे बप्पा व त्याचे सोबत सात ते आठ इसम व एक महिला यांनी सोने विकण्याच्या निमित्ताने दि. 07.10.2024 रोजी 13.00 वा. सु. सरमकुंडी फाटा वरुन एनएच 52 हायवे रोडवरील धाराशिव दिशेला जाणारे अंदाजे 4 अंतरावर रोडलगत बोलावून घेवून राजेंद्र संगेकर यांना लाथाबुक्यांनी मारहाण करुन त्यांचे जवळील रोख रक्कम 5,20,000₹ व मोबाईल फोन असा एकुण 5,37,000₹ किंमतीचा माल जबरदस्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-राजेंद्र संगेकर यांनी दि.08.10.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 310 (2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे
दुचाकी चोरीची घटना
वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतच दुसऱ्या एका घटनेत चुर्मापुरी येथील अशोक शिंदे यांची 20 हजार रुपये किमतीची दुचाकी 4 ऑक्टोबर रोजी पारगाव येथून चोरीला गेली. याप्रकरणीही वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी नामे-अशोक बापु शिंदे, वय 43 वर्षे, रा. चुर्मापुरी ता. अंबड जि. जालना, यांची अंदाजे 20,000₹ किंमतीची एचएफ डिलक्स कंपनीची मोटरसायकल क्र एमएच 21 बी.ए. 2192 जिचा इंजिन नंबर HA11EKG9F03499 व चेसीस नंबर MBLHA11AZG9F03419 ही दि.04.10.2024 रोजी 00.30 ते 01.15 वा. सु. पारगाव शिवारातुन हॉटेल जमींदार धाब्याचे बाजूला असलेल्या रिकामे जागेतुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अशोक शिंदे यांनी दि.08.10.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303 (2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे
घरफोडीतून दागिन्यांची चोरी
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत सकनेवाडी येथील दिनकर शितोळे आणि वाघोली येथील भारत मगर यांच्या घरांमध्ये 7 ऑक्टोबर रोजी चोरी झाली. चोरट्यांनी दोन्ही घरांमधील कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण 3 लाख 3 हजार 400 रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी नामे-दिनकर मारुती शितोळे, वय 48 वर्षे, रा.सकनेवाडी ता. जि. धाराशिव यांचे राहते घराचे कडी कोंड अज्ञात व्यक्तीने दि.07.10.2024 रोजी 13.00 ते 17.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन कपाटातील सोन्याचे 56 ग्रॅम वजनाचे दागिने व चांदीचे दागिने एकुण 1,63,400₹ किंमतीचा माल व वाघोली येथील राहणारे भारत निवृत्ती मगर यांचे राहाते घराचे कडी कोंडा तोडून आत प्रवेश करुन कपाटातील 6 तोळे 9 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने एकुण 1,40,000₹ असा एकुण 3,03,400₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-दिनकर शितोळे यांनी दि.08.10.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 331 (3), 305 अन्वये गुन्हा नोंदवला आहे
शेतीच्या अवजारांची चोरी
येरमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मांडवा येथील शकील काझी यांच्या शेतातील 90 हजार रुपये किमतीची शेतीची अवजारे चोरीला गेली. याप्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी नामे-शकील महमंद युसुफ काझी, वय 65 वर्षे, रा. मांडवा ता. वाशी जि.धाराशिव,यांचे बावी शिवारातील शेत गट नं 557 मधील शेतीचे अवजारे लोखंडी कुळव, लोखंडी मोगडा, लोखंडी बळी नांगर, लोखंडी 02 पाईप, ट्रकचे जुने पाटे, ट्रॅक्टर ट्रॉलीचा फाळका असा एकुण 90,000₹ किंमतीचे अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-शकील काझी यांनी दि.08.10.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303 (2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे
या सर्व घटनांमुळे धाराशिव परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून चोरट्यांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.