धाराशिव: धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आंबी, आनंदनगर, तामलवाडी, तुळजापूर आणि वाशी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या वेगवेगळ्या चोरींच्या घटनांमध्ये घरफोडी, वाहन चोरी आणि प्रवाशांच्या सामानाची चोरी अशा प्रकारच्या घटनांचा समावेश आहे.
आंबी: मलकापूर येथील पार्वती आवटे यांच्या घरात 13 ऑक्टोबर रोजी रात्री चोरी झाली. अज्ञात चोरट्यांनी घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि मोबाईल फोन असा एकूण 3 लाख 4 हजार 900 रुपयांचा ऐवज लंपास केला.
फिर्यादी नामे-पार्वती पोपट आवटे, वय 35 वर्षे, रा. मलकापूर ता. परंडा जि. धाराशिव यांचे राहते घराचा कडी कोंडा अज्ञात चार व्यक्तीने दि.13.10.2024 रोजी 21.30 ते दि. 14.10.2024 रोजी 03.30 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन कपाटातील 36 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने वरेडमी कंपनीचा मोबाईल फोन असा एकुण 3,04,900₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-पार्वती आवटे यांनी दि.14.10.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आंबी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 331(4), 305 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : वडगाव सिध्देश्वर येथील जगन्नाथ वाडकर यांची 40 हजार रुपये किमतीची मोटरसायकल 9 ऑक्टोबर रोजी धाराशिव येथून चोरीला गेली.
:फिर्यादी नामे-जगन्नाथ रामेश्वर वाडकर, वय 42 वर्षे, रा.वडगाव सिध्देश्वर ता. जि.धाराशिव यांची अंदाजे 40,000₹ किंमतीची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटरसायकल क्र एमएच 25 एएफ 6823 ही दि.09.10.2024 रोजी 21.30 ते दि. 10.10.2024 रोजी 07. 00 वा. सु.समता कॉलनी सह्याद्री कॉर्नर दुध डेअरी समोर धाराशिव येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-जगन्नाथ वाडकर यांनी दि.14.10.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303( 2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तामलवाडी: खिरणी मळा येथील जीशान सिद्दीकी यांचा 4 लाख 30 हजार रुपये किमतीचा ट्रक 12 ऑक्टोबर रोजी काटी रोडवरील मसला पाटी येथून चोरीला गेला.
फिर्यादी नामे-जीशान खलील रहेमान सिद्दीकी, वय 31 वर्षे, रा. खिरणी मळा ता.जि.धाराशिव यांचा अंदाजे 4,30,000₹ किंमतीचा अशोक लिलॅन्ड कंपनीचा ट्रक क्र एमएच 40 बीएल 9302 हा दि.12.10.2024 रोजी 21.00 ते 23.30वा. सु.काटी रोडवरील मसला पाटी येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-जीशान खलील सिद्दीकी यांनी दि.14.10.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303( 2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर: सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील बादलकोट येथील रहिवासी सिद्धेश्वर चौगुले यांची 35 हजार रुपये किमतीची मोटरसायकल 2 ऑक्टोबर रोजी तुळजापूर येथून चोरीला गेली.
फिर्यादी नामे-सिध्देश्वर उत्तम चौगुले, वय 38 वर्षे, रा.चौगुले वस्ती बादलकोट ता. पंढरपुर जि.सोलापूर यांची अंदाजे 35,000₹ किंमतीची मोटरसायकल क्र एमएच 13 बीएच 0994 ही दि.02.10.2024 रोजी 07.30 ते 11.15 वा. सु.दिपक चौक तुळजापूर येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सिध्देश्वर चौगुले यांनी दि.14.10.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303( 2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
वाशी: कर्नाटक येथील उत्तम कुमानाचे हे त्यांच्या मित्रांसह केदारनाथला जात असताना 14 ऑक्टोबर रोजी वाशी टोलनाक्याजवळ त्यांच्या टॅम्पो ट्रॅव्हलरमधून 70 हजार रुपये रोख आणि इतर साहित्य चोरीला गेले.
फिर्यादी नामे-उत्तम भैरु कुमानाचे, वय 39 वर्षे, रा. गणेश नगर बेळगाव कर्नाटक हे त्यांचे मित्र हे 17 सिटर टॅम्पो ट्रॅव्हलर गाडी क्र केए 22 डी 0068 या मध्ये गणेश नगर बेळगाव कर्नाटक येथुन केदारनाथ येथे जात होते. दि. 14.10.2024 रोजी 01.00 ते 02.00 वा. सु. येडशी टोलनाका ते पारगाव टोलनाका दरम्यान अज्ञात व्यक्तीने टॅम्पो ट्रॅव्हलर मधील ट्रॅाली टाईप इटकरी, काळ्या, रेड, ब्राउन व इतर रंगाच्या 13 बॅग ज्यामधील रोख रक्कम 70,000₹ कादपत्रे व कपडे चोरुन नेले.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-उत्तम कुमानाचे यांनी दि.14.10.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303( 2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.