• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, July 11, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजाभवानी मंदिर परिसरात चोरीचा डाव उधळला; महिला चोरटी रंगेहात जेरबंद

admin by admin
March 29, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजाभवानी मंदिर परिसरात चोरीचा डाव उधळला; महिला चोरटी रंगेहात जेरबंद
0
SHARES
774
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर: श्री क्षेत्र तुळजाभवानी मंदिर परिसरात दर्शनासाठी आलेल्या महिला भाविकाची पर्स आणि दागिने चोरण्याचा प्रयत्न सुरक्षारक्षकांच्या सतर्कतेमुळे उधळून लावण्यात आला आहे. निंबाळकर दरवाजा ते राजे शहाजी महाद्वार परिसरातील पाटीलवाडा येथे ही घटना घडली असून, चोरीचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

पुण्यातील लोणी काळभोर येथील रहिवासी असलेल्या सुरेखा वाडकर या महिला भाविक मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. यावेळी सरोज पवार नामक महिलेने त्यांच्या जवळील पर्स आणि दागिने हातचलाखीने चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच ठिकाणी कर्तव्यावर असणारे मंदिर संस्थानचे सुरक्षा रक्षक प्रतीक धनके आणि लहू बोंदर यांचे लक्ष तिच्याकडे गेले. सरोज पवार हिच्या संशयास्पद हालचाली लक्षात येताच त्यांनी तत्काळ धाव घेत तिला चोरी करताना रंगेहात पकडले.

सुरक्षा रक्षकांनी या महिलेला तातडीने मंदिर परिसरातील पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन चौधर यांच्या ताब्यात दिले. पोलिसांकडून तिची प्राथमिक चौकशी करण्यात आली असून, पुढील कायदेशीर कारवाईसाठी तिला तुळजापूर पोलीस स्टेशन येथे पाठविण्यात आले आहे.

या संपूर्ण कारवाईदरम्यान सहायक सुरक्षा निरीक्षक श्रीकांत पवार, प्रतीक दिवाणजी, सुरक्षा पर्यवेक्षक बिभीषण माने, योगेश फडके यांच्यासह मंदिर संस्थानचे इतर सुरक्षा कर्मचारी उपस्थित होते. सुरक्षा यंत्रणेने दाखवलेल्या या तत्परतेमुळे भाविकांमधून समाधान व्यक्त केले जात असून, मंदिर परिसरातील सुरक्षेवर विश्वास दृढ झाला आहे.

Previous Post

कत्तलीसाठी गोवंशीय जनावरांची बेकायदेशीर वाहतूक; पिकअपसह ४ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकावर गुन्हा दाखल

Next Post

नळदुर्गमध्ये ४८ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; कारवाई करणाऱ्या पोलिसांना धमकी, चौघांवर गुन्हा दाखल

Next Post
धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

नळदुर्गमध्ये ४८ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; कारवाई करणाऱ्या पोलिसांना धमकी, चौघांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

भूम शहरात तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला!

July 11, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

परंड्यात ‘उपोषणाचा अर्ज’ दिल्याच्या रागातून घरावार जीवघेणा हल्ला!

July 11, 2026
कळंब – मोबाईलवर गेम खेळू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून १६ वर्षांच्या मुलीची आत्महत्या

कळंब तालुक्यात सावकारी त्रासाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या! हावरगाव शिवारात लिंबाच्या झाडाला घेतला गळफास; कोल्हे दांपत्याविरुद्ध गुन्हा दाखल

July 11, 2026
धाराशिव पीक विमा: उच्च न्यायालयाच्या निकालाने शेतकऱ्यांना धक्का, कंपनीला दिलासा

हरवलेल्या विवाहित महिलेला शोधून न्यायालयात हजर करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

July 10, 2026
‘हिंदुत्ववादी सरकारनेच आई तुळजाभवानीच्या सुरक्षेशी तडजोड केली का?’

‘हिंदुत्ववादी सरकारनेच आई तुळजाभवानीच्या सुरक्षेशी तडजोड केली का?’

July 10, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group