• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, October 20, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजापूर येथील बहुचर्चित निघृण खून खटल्याचा निकाल: सबळ पुराव्याअभावी दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता

admin by admin
September 1, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव तालुक्यातील लाचखोर तलाठ्यास पाच वर्षांचा कारावास
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर: तुळजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २०२१ मध्ये घडलेल्या बहुचर्चित व निघृण खून खटल्याचा महत्त्वपूर्ण निकाल लागला असून, जिल्हा व सत्र न्यायाधीश खोमणे यांनी सबळ पुराव्याअभावी दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले आहेत. बचाव पक्षातर्फे ॲड. विशाल प्रभाकर साखरे यांनी केलेला युक्तिवाद आणि घेतलेला कसून उलटतपास या प्रकरणात अत्यंत निर्णायक ठरला.

नेमके प्रकरण काय होते?

तुळजापूर पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा रजिस्टर क्रमांक ११३/२०२१ (सत्र खटला क्र. ५७/२०२१) अन्वये भा.दं.वि. कलम ३०२, २०१, १२०(ब) सह ३४ नुसार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सरकार पक्षाच्या आरोपानुसार, आरोपींनी मयताकडे पैसे देऊन बंदूक मागितली होती. मात्र, मयताने बंदूक विकत न दिल्याच्या कारणावरून मयताचा कोयता व गुप्तीने वार करून निर्घृण खून केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. २३ मार्च २०२१ रोजी संध्याकाळी मयत कामावरून परत आल्यावर आरोपींना भेटण्यास गेला. त्यानंतर तुळजापूर येथील वाइन शॉपमधून मद्य खरेदी करून ते एका अज्ञात ठिकाणी गेले, जिथे मयताच्या गळ्यावर व पोटावर अनेक वार करून त्याची हत्या करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले होते. घटनेनंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली होती आणि ते मागील सुमारे ५ वर्षांपासून ‘अंडरट्रायल’ (न्यायालयीन कोठडीत) होते; या कालावधीत त्यांना जामीन मंजूर झालेला नव्हता.

बचाव पक्षाचा प्रभावी युक्तिवाद व उलटतपास:

सदर प्रकरणात दोन्ही आरोपींच्या वतीने ॲड. विशाल प्रभाकर साखरे यांनी बाजू मांडली. त्यांनी सरकार पक्षाच्या साक्षीदारांची कसून उलटतपासणी घेत तपासातील अनेक गंभीर त्रुटी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या:

  1. केवळ संशयावरून कारवाई: फिर्यादीने प्रत्यक्ष घटना पाहिलेली नसून संपूर्ण फिर्याद केवळ संशयावर आधारित होती.

  2. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचा अभाव: घटनास्थळ निर्मनुष्य ठिकाणी असल्याने खुनाची घटना घडताना कोणीही पाहिले नव्हते; या प्रकरणात कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता.

  3. कायदेशीर त्रुटी व मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन: आरोपींना अटक करताना सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) मार्गदर्शक तत्त्वांचे पालन झाले नाही तसेच अटकेचे ठोस कारण दिले गेले नाही.

  4. पंचनाम्यांमधील विसंगती: जप्ती पंचनामा, घटनास्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा व कपडे जप्ती पंचनामा या सर्व प्रक्रियेत गंभीर त्रुटी असल्याचे युक्तिवादात सिद्ध करण्यात आले.

  5. साक्षीदारांचे असमर्थन: रिक्षाचालक, बारमधील साक्षीदार व पानटपरी चालक यांच्या साक्षी सरकार पक्षाच्या सिद्धांताला बळकटी देऊ शकल्या नाहीत.

  6. डॉग स्क्वॉड व वैद्यकीय पुराव्यांवर प्रश्नचिन्ह: डॉग स्क्वॉडच्या कार्यपद्धतीवर समर्पक प्रश्नांद्वारे आक्षेप घेण्यात आले. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उलटतपासणीतही आरोपींनी हा गुन्हा केल्याचे सिद्ध होत नसल्याचे समोर आले.

न्यायालयाचा निकाल:

ॲड. विशाल साखरे यांनी मांडलेला युक्तिवाद, वैद्यकीय व फॉरेन्सिक अहवालांमधील विसंगती आणि पोलीस तपासातील त्रुटी ग्राह्य धरत, माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. खोमणे यांनी आरोपींचा संशयाचा फायदा देऊन त्यांची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली.

या खटल्यात ॲड. विशाल साखरे यांच्यासोबत ॲड. मंजुषा विशाल साखरे, ॲड. महेश लोहार, ॲड. शुभम तांबे, ॲड. अमित गोळे, ॲड. आकाश एडके, ॲड. संकेत गोरे, ॲड. ओंकार कोरेगावकर, ॲड. अर्चना कांबळे, ॲड. लक्ष्मीकांत कुलकर्णी, ॲड. रोहित लोमटे आणि ॲड. पृथ्वीराज खोचरे यांनी सहकार्य केले.

Previous Post

‘प्रसाद कोंडे-देशमुख माझे OSD-PA नव्हते’; फलटण प्रकरणावर तानाजी सावंतांचा खुलासा

Next Post

पावसाच्या खंडामुळे पिकांचे मोठे नुकसान; तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या

Next Post
धाराशिव जिल्ह्यात रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी केवळ २१ टक्के

पावसाच्या खंडामुळे पिकांचे मोठे नुकसान; तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या

ताज्या बातम्या

धाराशिव नगर पालिका : अखेर उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे यांचा राजीनामा मंजूर; नव्या निवडीकडे सर्वांचे लक्ष

धाराशिव नगर पालिका : अखेर उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे यांचा राजीनामा मंजूर; नव्या निवडीकडे सर्वांचे लक्ष

October 18, 2026
‘रडू नको बाळा’वर डिवचणारा कार्यकर्ता आता ओमराजेंच्याच गळ्यात गळा घालून रडला; नितीन शेरखानेंचा भाजपला ‘बदाबदा’ दणका!

‘रडू नको बाळा’वर डिवचणारा कार्यकर्ता आता ओमराजेंच्याच गळ्यात गळा घालून रडला; नितीन शेरखानेंचा भाजपला ‘बदाबदा’ दणका!

October 18, 2026
हॉटेल मालकाचा खून करून चार राज्यांत पळालेल्या आरोपींच्या धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या; ४८ तासांत छडा

हॉटेल मालकाचा खून करून चार राज्यांत पळालेल्या आरोपींच्या धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या; ४८ तासांत छडा

October 18, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव जिल्ह्यात अपहरणाच्या दोन घटना; ढोकीत ५२ वर्षीय व्यक्ती तर आनंदनगरमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता

October 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : ‘आमच्याकडे रागाने का बघतोस?’ म्हणून २४ वर्षीय तरुणावर कोयता, काठी अन् बेल्टने हल्ला

October 17, 2026

Recent Posts

  • धाराशिव नगर पालिका : अखेर उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे यांचा राजीनामा मंजूर; नव्या निवडीकडे सर्वांचे लक्ष
  • ‘रडू नको बाळा’वर डिवचणारा कार्यकर्ता आता ओमराजेंच्याच गळ्यात गळा घालून रडला; नितीन शेरखानेंचा भाजपला ‘बदाबदा’ दणका!
  • हॉटेल मालकाचा खून करून चार राज्यांत पळालेल्या आरोपींच्या धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या; ४८ तासांत छडा
  • धाराशिव जिल्ह्यात अपहरणाच्या दोन घटना; ढोकीत ५२ वर्षीय व्यक्ती तर आनंदनगरमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता
  • उमरगा : ‘आमच्याकडे रागाने का बघतोस?’ म्हणून २४ वर्षीय तरुणावर कोयता, काठी अन् बेल्टने हल्ला
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!