तुळजापूर : फिर्यादी नामे-रत्नेश महादेव गाटे, वय 24 वर्षे, रा. तुळजापूर खु., ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे राहाते घराचे किचन रुमच्या दरवाज्याचे आतील लॉक अज्ञात सात व्यक्तीने दि. 12.04.2024 रोजी 01.50 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन 64 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, व रोख रक्कम 2,00,000₹ असा एकुण 4,15,000₹ किंमतीचा माल हातातील असलेल्या काठ्याचा रॉडचा च चाकुचा धाक दाखवून व वडीलांस काठीने मारहाण करुन जबरीने चोरुन नेला. अशा मुजकुराच्या फिर्यादी नामे- रत्नेश गाटे यांनी दि. 12.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे 395 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : फिर्यादी नामे-नेताजी केरबा वरुडकर, वय 56 वर्षे, रा. एस.टी. कॉलनी विद्यामाता शाळेजवळ बायपास रोड ता. जि. धाराशिव यांचे राहाते घराचा कडी कोंडा अज्ञात व्यक्तीने दि.11.04.2024 रोजी 17.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन घरातील कपाटातील 05 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम 5,000₹ असा एकुण 30,000₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मुजकुराच्या फिर्यादी नामे- नेताजी वरुडकर यांनी दि. 12.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे 454, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा : फिर्यादी नामे-दत्तात्रय माणिक जगताप, वय 49 वर्षे, रा. डिग्गी रोड उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव यांची अंदाजे 20,000₹ किंमतीचा हिरो होन्डां स्पलेंडर प्लस कंपनीची मोटरसायकल क्र एमएच 25 एस 9706 इंजिन नं HA10EA9HMB2692 चेसी नं MBLHA10EJ9HH54970 ही दि. 10.04.2024 रोजी 13.30 ते 16.30 वा. सु. दामोले यांचे फार्म हाउस मध्ये शेतातुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मुजकुराच्या फिर्यादी नामे- दत्तात्रय जगताप यांनी दि. 12.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
फसवणूक
धाराशिव : फिर्यादी नामे- माधव भानुदास शिंदे, वय 61 वर्षे, रा. माणिक चौक धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी आरोपी नामे-1) लक्ष्मण आप्पु पाटील, रा.अंबेजोगाई ता. अंबेजोगाई जि. बीड यांना दि. 06.12.2023 ते आज पावेतो सांजा रोड धाराशिव येथील मयुर ट्रेडर्स नावाचे पोल्ट्रीचे दुकानात धाराशिव येथे कोंबड्याचे पक्षी खरेदीसाठी 1,33,400₹ व त्यांचेसाठी लागणारे खाद्य खरेदी साठी 19,900₹ विश्वासाने ऑनलाईन पेमेंट केले होते. नमुद आरोपीने विश्वासाने पैसे घेवून माल व मालाचे पैसे ने देता फिर्यादीची फसवणुक केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- माधव शिंदे यांनी दि.12.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे 420, 406 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.