धाराशिव : धाराशिव शहर पो.ठा. चे पथक दि.12.04.2024 रोजी 11.30 वा. सु. धाराशिव शहर पो.ठा. हद्दीत धाराशिव शहर येथे रस्त्यावर पेट्रोलिंग करत असताना तुळजापूर नाका, धाराशिव येथे तुळजापूर नाका ता. जि. धाराशिव येथील- हुसेन पापा शेख, हा लोकांचे जिवीत धोक्यात येईल असे विना परवाना स्वत:चे कब्जात एक लोखंडी कोयता बेकायदेशीररीत्या हातात घेउन फिरत असताना पथकास आढळला. यावर पथकाने आरोपी यास ताब्यात घेउन त्याच्याजवळील ती कोयता जप्त करुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन शस्त्र कायदा कलम- 4, 25, अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
कळंब : कळंब पो.ठा. चे पथक दि. 12.04.2024 रोजी 07.45 वा. सु. कळंब पो.ठा. हद्दीत कळंब येथे रस्त्यावर पेट्रोलिंग करत असताना कळंब बसस्थानक कळंबच्या आवारात असलेल्या काटेरी झाडीत सरकारी दवाखाना कळंब च्या समोर रुक्साना बागवान यांचे जागेत कळंब ता. कळंब जि. धाराशिव येथील-फेऱ्या उर्फ फिरोज पाशा बागवान, वय 32 वर्षे, हा लोकांचे जिवीत धोक्यात येईल असे विना परवाना स्वत:चे कब्जात एक लोखंडी तलवार अंदाजे 100 ₹ किंमतीची बेकायदेशीररीत्या हातात घेउन फिरत असताना पथकास आढळला. तसेच त्यांने मा. जिल्हाधिकारी साहेब धाराशिव यांचे आदेशाचे उल्लंघन केले. यावर पथकाने आरोपी यास ताब्यात घेउन त्याच्या जवळील ती तलवार जप्त करुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन शस्त्र कायदा कलम- 4, 25, मुंबई पोलीस कायदा कलम 135 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.