नळदुर्ग :आरोपी नामे- 1) अविनाश नागनाथ मेंडके, 2) विरभद्र भिमाशंकर मेंडके, 3) भिमाशंकर विरभद्र मेंडके, 4) नागनाथ विरभद्र मेंडके सर्व रा. लोहगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 11.04.2024 रोजी 13.00 वा. सु. अहिल्यानगर लोहगाव येथे फिर्यादी नामे- सचिन शशीकांत पाटील वय 41 वर्षे, रा.लोहगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव नमुद आरोपींनी माझ्या भाच्याला तु कट का मारला या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाणकरुन कुह्राडीच्या दांड्याने डोक्यात मारल्यास गंभीर दुखापत होवून फिर्यादीच्या जिवीतास धोका निर्माण होउ शकतो हे माहीत असताना सुध्दा कुह्राडीच्या दांडयाने डोक्यात मारुन जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सचिन पाटील यांनी दि.12.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे 308, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी : आरोपी नामे-1)काकासाहेब दत्तु वाकुरे, 2) लक्ष्मण दत्तु वाकुरे, 3) गोविंदा काकासाहेब वाकुरे, रा. रामवाडी ता. जि. धाराशिव यांनी दि. 10.04.2024 रोजी 13.00 ते 13.30 वा. सु. रामवाडी शिवारात गट नं 45 मध्ये फिर्यादी नामे- बालाजी जरीचंद्र व्हरकटे, वय 45 वर्षे, रा. कोळेवाउी ता.जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी बाभळीचे झाड का तोडीत आहेस ते तोडायचे नाही सदर जमीनीवर इतर अधिकारी म्हणून आमचे पण अधिकार आहे असे म्हाणून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- बालाजी व्हरकटे यांनी दि.12.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.