• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, September 17, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसांसह तरुण जेरबंद!

धाराशिवमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

admin by admin
June 13, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसांसह तरुण जेरबंद!
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) धडक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत आंदोरा येथील हॉटेल निसर्ग समोरून एका ३२ वर्षीय तरुणाला एका गावठी कट्ट्यासह दोन जिवंत काडतुसांसह रंगेहात अटक करण्यात आली आहे. शाम शिवाजी काळे (वय ३२, रा. झगडेगल्ली, भूम, जि. धाराशिव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून एकूण ४६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हॉटेलबाहेर रचला सापळा

मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यात गस्त घालत असताना , ‘शाम काळे’ हा तरुण आंदोरा येथे जात पंचायतीसाठी आला असून, तो हॉटेल निसर्ग समोर थांबला आहे व त्याच्याकडे गावठी कट्टा असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. पथकाने तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना पूर्वकल्पना देऊन हॉटेल निसर्ग परिसर गाठला.

कमरेला खोवला होता कट्टा

हॉटेलबाहेर संशयास्पदरीत्या थांबलेल्या शाम काळे याला पोलीस पथकाने अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता, पोलिसांना त्याच्या कमरेला खोवलेला एक लोखंडी धातूचा व लाकडी ग्रीप असलेला गावठी कट्टा आणि पॅन्टच्या खिशात दोन जिवंत काडतुसे मिळून आली. पोलिसांनी कट्टा आणि काडतुसे जप्त करून आरोपीला ताब्यात घेतले असून , त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर कळंब पोलीस ठाण्यात अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाईसाठी त्याला कळंब पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि  सचिन खटके, पोलीस अंमलदार विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर आणि रोहित दंडनाईक यांच्या पथकाने केली आहे.

Previous Post

तुळजापुरात खळबळजनक! वयोवृद्ध शेतकऱ्याकडे ५ लाखांची खंडणी; ‘ॲट्रॉसिटी’ अन् छेडछाडीच्या खोट्या केसची धमकी

Next Post

अचलेर तांड्यावर जुन्या वादातून हाणामारी;  सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

अचलेर तांड्यावर जुन्या वादातून हाणामारी;  सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : सामाजिक वनीकरण कार्यालयात घुसून वनरक्षकाच्या अंगावर ओतली काळी शाई; शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

September 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर : पैशांच्या व्यवहारावरून तरुणाला कोयत्याने मारहाण अन् जातीवाचक शिवीगाळ

September 17, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

पाथरुड-पाटसांगवी रोड : हॉटेल सह्याद्रीवर भूम पोलिसांची धडक धाड; गांजासह देशी-विदेशी दारूचा साठा जप्त

September 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

दिंडेगाव : कुटुंब शेतात जाताच चोरट्यांनी घराचा पत्रा उचकटला; कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज लंपास

September 16, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

जळकोट : घरासमोरील कंपाऊंडच्या आडोशाला गांजाची विक्री; ७८ वर्षीय वृद्धाकडून ४२ हजारांचा गांजा जप्त, नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल

September 16, 2026

Recent Posts

  • उमरगा : सामाजिक वनीकरण कार्यालयात घुसून वनरक्षकाच्या अंगावर ओतली काळी शाई; शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल
  • तुळजापूर : पैशांच्या व्यवहारावरून तरुणाला कोयत्याने मारहाण अन् जातीवाचक शिवीगाळ
  • पाथरुड-पाटसांगवी रोड : हॉटेल सह्याद्रीवर भूम पोलिसांची धडक धाड; गांजासह देशी-विदेशी दारूचा साठा जप्त
  • दिंडेगाव : कुटुंब शेतात जाताच चोरट्यांनी घराचा पत्रा उचकटला; कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज लंपास
  • जळकोट : घरासमोरील कंपाऊंडच्या आडोशाला गांजाची विक्री; ७८ वर्षीय वृद्धाकडून ४२ हजारांचा गांजा जप्त, नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!