• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, September 10, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजापूर ड्रग्ज प्रकरण: कोर्टात हाय व्होल्टेज ड्रामा, ‘पिटू’ अखेर गजाआड!

admin by admin
June 6, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
तुळजापूर ड्रग्ज प्रकरण: माजी नगराध्यक्षा पतीला अंतरिम जामीन; पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर: शुक्रवारी धाराशिव जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात एखाद्या थरारपटाच्या क्लायमॅक्सलाही लाजवेल असं दृश्य पाहायला मिळालं. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाचा कथित ‘मास्टरमाईंड’ आणि माजी नगराध्यक्षांचा पती विनोद उर्फ पिटू गंगणे याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालयानं जसा ‘फेटाळला’ हा शब्द उच्चारला, तसाच पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता त्याच्या मुसक्या आवळल्या. संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या या प्रकरणातल्या या नाट्यमय अटकेनंतर तुळजापूरच्या नागरिकांनी मात्र सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

कोर्टरूम बनलं नाट्यगृह: प्रश्नांच्या सरबत्तीने तपास अधिकारी निरुत्तर!

दिवसभर चाललेल्या या सुनावणीत नुसता युक्तिवाद झाला नाही, तर अक्षरशः प्रश्नांचा भडीमार झाला. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती टी. जी. मिटकरी यांनी तपास अधिकाऱ्यांना असे काही बोचरे सवाल केले की, भर कोर्टात त्यांची बोलती बंद झाली.

“दोषारोपपत्रात तुम्ही सेवन करणारे आणि तस्कर असे दोन गट कोणत्या आधारावर केले? गंगणे विरोधात पुरावे होते, तर त्याला तेव्हाच तस्करांच्या गटात का नाही टाकलं? त्याला वाचवायचं होतं का? की मग सगळं कोर्टावर सोडून द्यायचं होतं?” अशा थेट प्रश्नांवर तपास अधिकारी सपोनि गोकुळ ठाकूर फक्त माना खाली घालून उभे होते.

न्यायालयाने तर या प्रकरणाला राजकीय वळण देणारा प्रश्नही विचारला, “यामागे कोणता राजकीय दबाव होता का? गंगणे एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे म्हणून हे सर्व घडलं का?” या प्रश्नाने तर कोर्टात उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. पण उत्तर? तपास अधिकाऱ्यांकडून फक्त शांतता!

राजकीय दबावाचा ‘ड्रग्ज’ कनेक्शन?

सुरुवातीपासूनच या प्रकरणात आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या नावाभोवती संशयाचं धुकं दाटलं होतं. गंगणे हा आमदारांचा ‘इन्फॉर्मर’ होता, त्याच्या उपचाराचा खर्च आमदारांनी केला, अशा चर्चांना ऊत आला होता. डिसेंबर २०२३ पासून आमदारांना या प्रकरणाची माहिती असूनही ते गप्प का होते? या प्रश्नाचं उत्तर अजूनही गुलदस्त्यात आहे. आता तर खुद्द न्यायालयानेच ‘राजकीय दबावा’बद्दल प्रश्न विचारल्याने या चर्चांना अधिकच बळ मिळालं आहे.

सिंघम स्टाईल कारवाई!

जामीन अर्ज फेटाळल्यानंतर गंगणेच्या वकिलांनी उच्च न्यायालयात जाण्यासाठी ७२ तासांची मुदत मागितली. पण न्यायालयाने त्यांची ही मागणी धुडकावून लावत पोलिसांना कारवाईसाठी ‘ग्रीन सिग्नल’ दिला. मग काय, पोलिसांनीही कसलीही दिरंगाई न करता, न्यायालयाच्या आवारातच ‘पिटू’ला ताब्यात घेतलं.

या हाय-प्रोफाइल अटकेमुळे तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाला आता नवी दिशा मिळाली आहे. गंगणेच्या अटकेने या प्रकरणातील अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे येत्या काळात या प्रकरणात आणखी कोणते गौप्यस्फोट होतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Previous Post

त्रिंबक ढेंगळे धाराशिवचे नवे नगरपालिका सहआयुक्त

Next Post

 पिटूचे ‘सिक्रेट’ मोबाईल गायब! तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात नवा ट्विस्ट, कोणाकोणाचे धाबे दणाणले?

Next Post
तुळजापूर ड्रग्ज प्रकरण: माजी नगराध्यक्षा पतीला अंतरिम जामीन; पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

 पिटूचे 'सिक्रेट' मोबाईल गायब! तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात नवा ट्विस्ट, कोणाकोणाचे धाबे दणाणले?

ताज्या बातम्या

बापाची ४० वर्षांची ‘पाणीदार’ स्क्रिप्ट, खिसेगरम युट्युबर्सची फौज अन् साहेबांचा ‘तो’ कोणता डिसेंबर?

बापाची ४० वर्षांची ‘पाणीदार’ स्क्रिप्ट, खिसेगरम युट्युबर्सची फौज अन् साहेबांचा ‘तो’ कोणता डिसेंबर?

September 10, 2026
पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

स्पर्धा परीक्षेची धग आणि दुष्काळाची झळ; खासापुरीच्या २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत

September 10, 2026
‘जशास तसे’: राणादादांच्या लुडबुडीला तानाजी सावंतांचे सव्याज उत्तर, तुळजापुरातच केला ‘करेक्ट कार्यक्रम’!

‘जशास तसे’: राणादादांच्या लुडबुडीला तानाजी सावंतांचे सव्याज उत्तर, तुळजापुरातच केला ‘करेक्ट कार्यक्रम’!

September 10, 2026
“दुष्काळाच्या संकटात शेतकरी गुणवंत क्षीरसागर यांचे दुर्दैवी निधन; तानाजी सावंतांकडून कुटुंबाला आर्थिक मदत”

“दुष्काळाच्या संकटात शेतकरी गुणवंत क्षीरसागर यांचे दुर्दैवी निधन; तानाजी सावंतांकडून कुटुंबाला आर्थिक मदत”

September 10, 2026
पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

September 9, 2026

Recent Posts

  • बापाची ४० वर्षांची ‘पाणीदार’ स्क्रिप्ट, खिसेगरम युट्युबर्सची फौज अन् साहेबांचा ‘तो’ कोणता डिसेंबर?
  • स्पर्धा परीक्षेची धग आणि दुष्काळाची झळ; खासापुरीच्या २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत
  • ‘जशास तसे’: राणादादांच्या लुडबुडीला तानाजी सावंतांचे सव्याज उत्तर, तुळजापुरातच केला ‘करेक्ट कार्यक्रम’!
  • “दुष्काळाच्या संकटात शेतकरी गुणवंत क्षीरसागर यांचे दुर्दैवी निधन; तानाजी सावंतांकडून कुटुंबाला आर्थिक मदत”
  • पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!