धाराशिव ड्रग्ज प्रकरणात पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी पोलिसांना 72 तासांची अल्टिमेटम देत कार्यवाहीच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, या भूमिकेला भाजप आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी छेद देत पोलिसांच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतला.
तपासावर समाधान व्यक्त करत आमदार पाटील म्हणाले की, पोलीस गेल्या डिसेंबरपासून या प्रकरणाचा ताकदीने तपास करत असून, आता या तपासाची चक्र मुंबईपर्यंत फिरू लागली आहेत. जे कोणी या ड्रग्ज नेटवर्कमध्ये सामील असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पालकमंत्री VS आमदार : राजकीय संघर्षाचा नवा अध्याय?
राज्यात भाजप विरुद्ध शिवसेना असा संघर्ष असताना, धाराशिव जिल्ह्यातही त्याचे प्रतिबिंब उमटताना दिसत आहे. पालकमंत्री सरनाईक पोलिसांच्या कारवाईवर आक्षेप घेताना दिसत असताना, आमदार राणा पाटील मात्र पोलिसांच्या भूमिकेचे समर्थन करत आहेत.
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाचा तपास अधिक वेगाने सुरू असून, यात आता राजकीय रंग भरला गेला आहे. पुढील काही दिवसांत हा संघर्ष अधिक तीव्र होणार की सत्याचा विजय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे!