तुळजापूर शहरातील ड्रग्ज तस्करी प्रकरणाचा तपास वेगाने पुढे सरकत असताना, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापू कणे यांची आलिशान फॉर्च्युनर गाडी (क्रमांक एम एच २५, १०१०) तामलवाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. ही गाडी ड्रग्ज तस्करीसाठी वापरली जात असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. कणे सध्या फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
तुळजापूर शहरातील काही स्थानिक राजकीय आणि समाजातील प्रभावी व्यक्ती ड्रग्ज तस्करीच्या जाळ्यात गुरफटल्या असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणाचा तपास गेल्या महिन्यांपासून गतिमान झाला असून, पोलिसांनी अनेक ठिकाणी धाडी मारून आरोपींचा शोध घेतला आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण ३५ आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत.
अटक आरोपींची यादी:
पोलीस कोठडीत असलेले आरोपी:
१. सुलतान लतीफ शेख (वय ३४) – पुणे
२. जीवन नागनाथ साळुंखे (वय २९) – सोलापूर
३. राहुल कदम – परमेश्वर (तुळजापूर) – पोलिसाचा मुलगा
४. गजानन प्रदीप हंगरगेकर
न्यायालयीन कोठडीत असलेले आरोपी:
५. विश्वनाथ तर्फ पिंटू आप्पाराव मुळे (वय ४०) – सराटी, ता. तुळजापूर
६. सयाजी शाहूराज चव्हाण (वय २५) – तुळजापूर
७. ऋतुराज सोमनाथ गाहे (वय २४) – तुळजापूर
८. सुमित सुरेशराव शिंदे (वय ३५) – तुळजापूर
९. संकेत अनिल शिंदे (वय २३) – तुळजापूर
१०. संगिता वैभव गोळे (वय ३२) – मुंबई
११. संतोष अशोक खोत (वय ४९) – मुंबई
१२. अमित उर्फ चिम्या अशोकराव अरगडे (वय ३३) – तुळजापूर
१३. युवराज देवीदास दळवी (वय ३८) – तुळजापूर
१४. संदीप संजय राठोड (वय २२) – नळदुर्ग, ता. तुळजापूर
फरार आरोपींची यादी:
१. विनोद उर्फ पिटू गंगणे – माजी नगराध्यक्ष पती
२. चंद्रकांत उर्फ बापू कणे – माजी नगराध्यक्ष, तुळजापूर
३. शरद रामकृष्ण जमदाडे – माजी सभापती
४. इंद्रजित उर्फ मिटू रणजितसिंह ठाकूर – नळदुर्ग
५. स्वराज उर्फ पिनू सचिन तेलंग – तुळजापूर (माजी नगराध्यक्षांचा हस्तक)
६. वैभव अरविंद गोळे – मुंबई (आरोपी संगिता गोळे हिचा पती)
७. प्रसाद उर्फ गोटन कदम – परमेश्वर (तुळजापूर)
८. उदय शेटे
९. आबासाहेब गणराज पवार
१०. अलोक शिंदे
११. अभिजित गव्हाड
१२. विनायक इंगळे – तुळजापूर
१३. शाम भोसले – तुळजापूर
१४. संदीप टोले – तुळजापूर
१५. जगदीश पाटील – तुळजापूर
१६. विशाल सोंजी – तुळजापूर
१७. अभिजीत अमृतराव – तुळजापूर
१८. दुर्गेश पवार – तुळजापूर
१९. रणजीत पाटील – तुळजापूर
२०. नाना खुराडे – तुळजापूर
21. अर्जुन हजारे – उपळाई खुर्द, सोलापूर
या भीषण ड्रग्ज प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. नागरिकांनी या प्रकरणातील सर्व फरार आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, तपास तामलवाडी पोलिसांकडून एसआयटीकडे वर्ग करण्याची मागणीही जोर धरत आहे.
पोलिसांवर गंभीर आरोप:
आरोपींना अभय देणाऱ्या तत्कालीन पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांच्यासह इतर पोलिस अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी होत आहे.स्थानिक बीट अंमलदार यांना देखील दरमहा हप्ता चालू होता. त्याची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
सर्व आरोपींवर मोक्क्का लागू करून कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. ड्रग्ज माफियांना अभय देणाऱ्या पोलीस यंत्रणेवरही कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
धाराशिव लाइव्हची भूमिका:
सत्य मांडणे हेच आमचे व्रत आहे! कोणत्याही राजकीय दबावाखाली न येता, प्रामाणिक आणि वस्तुनिष्ठ वार्तांकन करणे हेच आमचे ध्येय आहे. नागरिकांनी सत्यावर विश्वास ठेवावा आणि धाराशिव लाइव्हवर खऱ्या बातम्यांचा विश्वास ठेवावा!