तुळजापूर शहराला ड्रग्जच्या विळख्यातून सोडवण्यासाठी पोलिस प्रशासन आक्रस्ताळे झाले असताना, गुन्हेगार मात्र मोकाट फिरत आहेत! आतापर्यंत या प्रकरणात तब्बल ३५ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, विकणारे किती आणि पिणारे किती? याचा अद्याप उलगडा झालेला नाही. दरम्यान, चार आरोपी अटकेत असले तरी दहा आरोपी तुरुंगात तर २१ आरोपी फरार आहेत!
फरार आरोपींची यादी : सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने सुटलेले गुंड!
१. विनोद उर्फ पिटू गंगणे – माजी नगराध्यक्ष पती
२. चंद्रकांत उर्फ बापू कणे – माजी नगराध्यक्ष, तुळजापूर
३. शरद रामकृष्ण जमदाडे – माजी सभापती
४. इंद्रजित उर्फ मिटू रणजितसिंह ठाकूर – नळदुर्ग
५. स्वराज उर्फ पिनू सचिन तेलंग – तुळजापूर (माजी नगराध्यक्षांचा हस्तक)
६. वैभव अरविंद गोळे – मुंबई (आरोपी संगिता गोळे हिचा पती)
७. प्रसाद उर्फ गोटन कदम – परमेश्वर (तुळजापूर)
८. उदय शेटे
९. आबासाहेब गणराज पवार
१०. अलोक शिंदे
११. अभिजित गव्हाड
१२. विनायक इंगळे – तुळजापूर
१३. शाम भोसले – तुळजापूर
१४. संदीप टोले – तुळजापूर
१५. जगदीश पाटील – तुळजापूर
१६. विशाल सोंजी – तुळजापूर
१७. अभिजीत अमृतराव – तुळजापूर
१८. दुर्गेश पवार – तुळजापूर
१९. रणजीत पाटील – तुळजापूर
२०. नाना खुराडे – तुळजापूर
21. अर्जुन हजारे – उपळाई खुर्द, सोलापूर
सत्ताधाऱ्यांच्या छत्रछायेखाली ड्रग्ज सम्राटांचा जाळ!
अनेक सत्ताधारी आणि राजकीय दबावामुळे पोलिसांच्या तपासाला खीळ बसल्याचे दिसत आहे. गुन्हा दाखल होताच आरोपींनी तुळजापूर सोडून पळ काढला, आणि त्यांचे साथीदार नॉट रिचेबल झाले आहेत! यातील कित्येक आरोपी माजी नगराध्यक्षांचे हस्तक असून, त्यांच्या राजकीय आश्रयामुळेच हे गुन्हेगारी जाळे विस्तारले आहे.
मकोका आणि मालमत्ता जप्तीची मागणी!
या प्रकरणात सहा महिने ते दोन वर्षांपर्यंत जामीन मिळणे कठीण आहे, त्यामुळे अनेक आरोपींच्या पायाखालील जमीन सरकली आहे. हे गुन्हेगारी जाळे उध्वस्त करण्यासाठी मकोका लावण्याची मागणी जोर धरत आहे. आरोपींच्या संपत्तीवर त्वरित टाच आणावी आणि त्यांच्या बेकायदेशीर मालमत्तांची जप्ती करावी, अशी मागणी आता जनतेतून होत आहे.
पोलीस उपअधीक्षक निलेश देशमुख आणि तामलवाडीचे सहा. पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर यांनी तपास सुरु केला असला तरी आरोपींच्या अटकेसाठी पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी व्यक्तिगत लक्ष घालण्याची गरज आहे. किमान तीन विशेष पथके तयार करून, स्थानिक गुन्हे शाखेला कार्यवाहीसाठी जोडावे, अशी स्थानिकांची मागणी आहे.
तुळजापूरला ड्रग्जमुक्त करण्यासाठी जनतेचा लढा!
तुळजापूर शहराला लागलेली ड्रग्जची कीड नष्ट करण्यासाठी सामाजिक संघटनांनी आणि सुज्ञ नागरिकांनी पुढे यावे. राजकीय आश्रयाने पसरलेली गुन्हेगारी साखळी तोडण्यासाठी कडक कारवाईची मागणी आता बुलंद होत आहे