• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, August 13, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजापुरात जुन्या भांडणातून थरार; तरुणावर गोळीबार, १० जणांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

admin by admin
February 9, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर: शहरातील खडकाळ गल्ली भागात मागील भांडणाच्या रागातून एका टोळक्याने तरुणाला बेदम मारहाण करत, मध्यस्थी करणाऱ्या साक्षीदारावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात दहा जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी आकाश रमेश अमृतराव (वय ३१, रा. खडकाळ गल्ली, तुळजापूर) आणि आरोपींमध्ये जुने वाद होते. याच कारणावरून दि. ०७ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६:३० च्या सुमारास आरोपींनी आकाश यांना गाठले. त्यांना शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली.

यावेळी तिथे उपस्थित असलेले साक्षीदार अष्टविनायक जाधव हे मध्ये आले असता, आरोपींनी त्यांच्या उजव्या पायाच्या पोटरीवर अज्ञात हत्याराने गोळीबार केला. या हल्ल्यात अष्टविनायक जाधव हे गंभीर जखमी झाले आहेत.

याप्रकरणी आकाश अमृतराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खालील आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे:
१. गणेश देवानंद रोचकरी २. रोहीत विक्रम पवार ३. अक्षय सज्जन गायकवाड ४. अतिष पोपट भांगे ५. अजय बंडु क्षिरसागर ६. मल्हार गायकवाड ७. प्रसाद परमेश्वर ८. खंडु विश्वनाथ कांबळे (सर्व रा. तुळजापूर) ९. ओम कांबळे (रा. काक्रंबा, ता. तुळजापूर) १०. एक अज्ञात साथीदार (अंदाजे)

तुळजापूर पोलिसांनी या सर्व आरोपींविरुद्ध भा.न्या.सं. कलम १०९ (गुन्ह्यास प्रोत्साहन), ११८(१) (जीवे मारण्याचा प्रयत्न), ११५(२) (दुखापत करणे), १९१(१), १९१(२), १९१(३) (दंगल करणे), १९० तसेच भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५, ५, २७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास तुळजापूर पोलीस करत आहेत.

 

Previous Post

धाराशिवमध्ये गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक रोखली; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Next Post

वडिलांना शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाला जबर मारहाण; उंडरगाव येथील तिघांवर गुन्हा दाखल

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

वडिलांना शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाला जबर मारहाण; उंडरगाव येथील तिघांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये भरधाव टिप्परच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू;

धाराशिवमध्ये भरधाव टिप्परच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू;

August 13, 2026
ड्रग्ज कनेक्शन भोवले! अटकेत असलेल्या नगरसेवक मोहसीन मिर्झाची ठाकरे गटातून हकालपट्टी

ड्रग्ज कनेक्शन भोवले! अटकेत असलेल्या नगरसेवक मोहसीन मिर्झाची ठाकरे गटातून हकालपट्टी

August 12, 2026
धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात ‘जनता दरबार’ सुरू, नागरिकांना थेट जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधता येणार

“साहेब, यंदा झाडे लावण्याआधी हे सांगा, गेल्या वर्षीची किती जगली?”

August 12, 2026
‘बंगल्या’वरून उडाला भडका अन् प्रवक्त्याने काढली ‘चार पक्ष’ बदलणाऱ्यांची राजकीय कुंडली!

‘बंगल्या’वरून उडाला भडका अन् प्रवक्त्याने काढली ‘चार पक्ष’ बदलणाऱ्यांची राजकीय कुंडली!

August 12, 2026
धाराशिवमध्ये भाजपची नवी टीम: तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी, संघटनात्मक बांधणीवर भर

परदेशातून ‘मल्हार पर्वा’ची एन्ट्री अन् वस्तादाने थेट ‘शिकाऊ पैलवाना’ला आस्मान दाखवले!

August 12, 2026

Recent Posts

  • धाराशिवमध्ये भरधाव टिप्परच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू;
  • ड्रग्ज कनेक्शन भोवले! अटकेत असलेल्या नगरसेवक मोहसीन मिर्झाची ठाकरे गटातून हकालपट्टी
  • “साहेब, यंदा झाडे लावण्याआधी हे सांगा, गेल्या वर्षीची किती जगली?”
  • ‘बंगल्या’वरून उडाला भडका अन् प्रवक्त्याने काढली ‘चार पक्ष’ बदलणाऱ्यांची राजकीय कुंडली!
  • परदेशातून ‘मल्हार पर्वा’ची एन्ट्री अन् वस्तादाने थेट ‘शिकाऊ पैलवाना’ला आस्मान दाखवले!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!