तुळजापूर : फिर्यादी नामे-रमेश पंडीत पवार, वय 42 वर्षे, र. खंडाळा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे राहाते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 16.05.2024 रोजी 04.30 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन कपाटातील 25 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, रियल मी कंपनीचा, सॅमसंग कंपनीचा, रेडमी कंपनीचे तीन मोबाईल फोन असा एकुण 71,000₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- रमेश पवार यांनी दि.16.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे 457, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी : फिर्यादी नामे-संजय धोंडीराम श्निगारे, वय 42 वर्षे, रा. खामगाव ता. जि. धाराशिव यांचे खामगाव शेत शिवारात शेत गट नं 128 मधून एक 3 एचपी कप्पी वरील मोटार, लाईट साठी लागणारे 200 फुट वायर, असा एकुण 8,000₹ किंमतीचा मुद्देमाल आरोपी नामे- पांडुरंग मारुती कांबळे, वय 68 वर्षे, रा. साकत पिंपरी ता. बार्शी जि. सोलापूर ह.मु. धाराशिव यांनी दि.16.05.2024 रोजी 04.00 वा. सु. चोरुन नेला.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- संजय शिनगारे यांनी दि.16.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : फिर्यादी नामे-निमेश जयराम गावीत, वय 39 वर्षे, रा. उस्मानपुरा चौक सिटी पॉईट हॉटेलच्या पाठीमागे सांजा रोड धाराशिव ता. जि. धाराशिव यांचे घराचे बांधकामाचे 15 लोखंडी प्लेट लांबी 3 फुट व रुंदी 2 फुट असे एकुण 18,000₹ प्लेट अज्ञात व्यक्तीने दि. 06.05.2024 रोजी 06.00 पुर्वी चोरुन नेल्या.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- निमेश गावीत यांनी दि.16.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.