• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, May 25, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजापुरात खाकीला भ्रष्टाचाराची वाळवी! पीआय अण्णासाहेब मांजरे यांना ‘अभय’ कुणाचे? एसपी मॅडम, कारवाई कधी करणार?

admin by admin
March 28, 2026
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
तुळजापूरमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा! भ्रष्ट पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांची उचलबांगडी निश्चित?
0
SHARES
807
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

पोलीस दलात कायदा सर्वांसाठी समान असल्याचा डंका वारंवार पिटला जातो; मात्र तुळजापूरचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्यासाठी वेगळा न्याय का लावला जात आहे? असा संतप्त सवाल आता जनता विचारत आहे. पोलीस ठाण्यातच सुरू असलेला लाचखोरीचा बाजार, शहरात फोफावलेले अवैध धंदे आणि उघडपणे चालणारी गुन्हेगारी यावर कारवाई करण्याऐवजी मांजरे यांना पाठीशी कोण घालत आहे? लाचखोरीच्या प्रकरणाला एक महिना होत आला तरी त्यांची अद्याप बदली न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.


पोलीस ठाण्यातच लाचखोरीचा ‘बाजार’

४ मार्च रोजी तुळजापूर पोलीस ठाण्याच्या आवारातच खाकी वर्दीला काळीमा फासणारी संतापजनक घटना घडली. एका दाखल गुन्ह्यात मदत करणे, कलमवाढ न करणे आणि मोटारसायकल जप्त न करण्यासाठी तब्बल ५ हजार रुपयांची लाच घेताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) श्रीनिवास रामदास आरदवाड (वय ४८) यांना एसीबीने (ACB) रंगेहाथ पकडले.

सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे, ही लाच थेट पीआय अण्णासाहेब मांजरे यांच्या सांगण्यावरूनच स्वीकारली गेल्याची खळबळजनक चर्चा सध्या शहर आणि पोलीस वर्तुळात रंगत आहे.

गुन्हेगारीचा सुळसुळाट आणि अवैध धंद्यांना ‘मोकळे रान’

पीआय मांजरे यांच्या ‘आशीर्वादाने’ तुळजापूर शहरात अवैध धंद्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत:

  • दहशतीचे वातावरण: गेल्या अवघ्या तीन महिन्यांत शहरात तब्बल तीन वेळा हवेत गोळीबार झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

  • अवैध धंद्यांचा महापूर: शहरात दारू, मटका, जुगार आणि वेश्याव्यवसाय राजरोसपणे आणि तेजीत सुरू आहे. पोलिसांचा कोणताही वचक उरलेला नाही.

महिला आणि लोकप्रतिनिधींचा संताप

या बिघडलेल्या परिस्थितीला आणि पोलिसांच्या निष्क्रियतेला कंटाळून अखेर भाजप नगरसेविका प्रियंका गंगणे यांनी महिलांना सोबत घेत रस्त्यावर उतरून थेट निवेदन दिले. यापाठोपाठ नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनीही शहरातील अवैध धंदे त्वरित बंद करण्यासाठी प्रशासनाला साकडे घातले आहे. जनतेचा उद्रेक होत असतानाही वरिष्ठ अधिकारी मूग गिळून गप्प का आहेत?

भ्रष्ट अधिकाऱ्याला कारवाईऐवजी थेट DySP पदाची बढती?

अण्णासाहेब मांजरे यांचा हा वादग्रस्त इतिहास नवा अजिबात नाही. यापूर्वी ते सातारा आणि बार्शी येथे कार्यरत असतानाही त्यांच्या हाताखालचे पोलीस कर्मचारी लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकले होते. “जिथे मांजरे, तिथे लाचखोरी” असे जणू समीकरणच बनले आहे.

असा काळा इतिहास पाठीशी असतानाही, मांजरे सध्या ‘पोलीस उपाधीक्षक’ (DySP) पदी पदोन्नती मिळवण्यासाठी जोरदार ‘फिल्डिंग’ लावत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका भ्रष्ट आणि निष्क्रिय अधिकाऱ्याला थेट बढतीचे बक्षीस दिले जाणार का? असा घणाघाती सवाल तुळजापूरची जनता विचारत आहे.


आता लक्ष वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे!

 सर्वांच्या नजरा विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्या दौऱ्याकडे लागल्या होत्या. त्यांच्या दौऱ्यानंतर मांजरे यांची उचलबांगडी नक्की होणार, अशी चर्चा होती, पण माशी नेमकी कुठे शिंकली ? असा प्रश्न विचारला जात आहे.

एसपी मॅडम, इतर अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाईचा बडगा उगारला जातो, मग मांजरे यांची उचलबांगडी कधी करणार? की हे ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ असेच चालणार?

Previous Post

खाकी वर्दीचा ‘सैराट’! रक्षकच निघाला भक्षक; तुळजापुरात पोलिसानेच उडवला दुसऱ्याच्या संसाराचा ‘फज्जा’

Next Post

पवनचक्कीचे साहित्य नेणाऱ्या गाड्या अडवून दोन लाखांच्या खंडणीची मागणी; वाहने जाळण्याची धमकी, ८ जणांवर गुन्हा दाखल

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

पवनचक्कीचे साहित्य नेणाऱ्या गाड्या अडवून दोन लाखांच्या खंडणीची मागणी; वाहने जाळण्याची धमकी, ८ जणांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

रांजणीत सालगड्यानेच केला विश्वासघात; मालकाचे सव्वाचार लाख रुपये घेऊन पोबारा

May 25, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

मळगीवाडीत शेतातील माती टाकण्याच्या वादातून वृद्धेला बेदम मारहाण

May 25, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

‘हॉर्न का वाजवला?’ म्हणत दाम्पत्याला लुटले; उमरगा चौरस्त्यावरील धक्कादायक घटना

May 25, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

तुळजापुरात किरकोळ वादातून दोघांवर चाकू हल्ला; बोंबले चौकातील घटनेने खळबळ, एकावर गुन्हा दाखल

May 24, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उमरग्यात ‘वंचित’च्या कार्यालयात घुसून पदाधिकाऱ्यावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला; शहरात खळबळ

May 24, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group