तुळजापूर – आरोपी नामे-बालाजी त्रिंबक भोसले, लतीका त्रिंबक भोसले, कल्याण त्रिंबक भोसले, प्रतिक्षा बालाजी भोसले, सर्व सांगवी मार्डी, ह.मु. धाराशिव, भाग्यश्री इंगळे, रा. रुईभर ता. जि. धाराशिव, पल्लवी भाउसाहेब मस्के रा. धुत्ता ता. जि. धाराशिव यांनी दि. 25.06.2024 रोजी 18.45 वा. सु. सांगवी मार्डी शेत गट नं 136 मध्ये फिर्यादी नामे- सुनिल अनंतराव भोसले, वय 55 वर्षे, रा. सांगवी मार्डी ता. तुळजापूर जि. धाराशिव ह.मु तामलवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना उडिद पेरलेले शेत ट्रॅक्टरने रोटर करुन नुकसान केल्याने ते विचारण्याचे कारणावरुन नमुद आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच फिर्यादीच्या पत्नी या भाडंण सोडवण्यास आल्या असता नमुद आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. जर तुम्ही या शेतात परत आला तर तुम्हाला खल्लास करु अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सुनिल भोसले यांनी दि.26.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 143, 147, 149, 427, 323, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर : आरोपी नामे-सुनिल अनंतराव भोसले, शशीकला सुनिल भोसले, संजय अनंतराव भोसले, कांचन संजय भोसले, गणेश भोसले, विराज भोसले, बंटी भोसले, सर्व रा. सांगवी मार्डी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 25.06.2024 रोजी 18.45 वा. सु. सांगवी मार्डी जमीन गट नं 136 मध्ये फिर्यादी नामे- बालाजी त्रिबंक भोसले, वय 26 वर्षे, रा. भागीरथी कॉलनी हनुमान चौक बाशी रोड धाराशिव ता. जि. धाराशिव यांना जमीनीच्या वादाचे कारणावरुन नमुद आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, हेल्मेटने मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादीची आई लतीका, पत्नी व बहिण भाग्यश्री हे भांडण सोडवण्यास आले असतान नमुद आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-बालाजी भोसले यांनी दि.26.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 143, 147, 149, 323, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.