उमरगा – उमरगा येथील शिवाजी महाविद्यालयात 5 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास आनंद मेळाव्यात झालेल्या वादातून एका 21 वर्षीय विद्यार्थ्यावर 9 जणांनी हल्ला केल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
व्यंकटेश गोविंद पवार (वय 21, रा. भारतनगर, उमरगा) असे हल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी, कत्तीने, हंटरने आणि काठीने मारहाण केली. पवार यांचा भाऊ अजय पवार आणि मित्र कार्तिक घोडके यांनाही आरोपींनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली.
पोलिसांनी अविनाश सुभाष खराते, सुमित बनसोडे, जय बनसोडे, बालाजी मारुती खराते, धरन मस्के, राम बनसोडे, राहुल बनसोडे, अमन दादाराव मस्के आणि पवन बनसोडे यांच्याविरुद्ध भादंवि कलम 118(1), 115(2), 352, 351(2)(3), 189(2), 191(2), 191(3), 190 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
वाशी येथे जनावरे बांधण्याच्या कारणावरून मारहाण, गुन्हा दाखल
वाशी : इंदापुर येथे 28 जुलै 2024 रोजी जनावरे बांधण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून 62 वर्षीय गोरख पांडुरंग गपाट यांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी भारत विष्णु गपाट आणि बबन सदाशिव गपाट यांच्याविरुद्ध वाशी पोलीस ठाण्यात 6 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी गोरख गपाट यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच लोखंडी गजाने मारहाण करून गंभीर जखमी केले. याशिवाय, त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली.