कळंब: कळंब येथील द्वारका नगरीमध्ये राजेंद्र मिटकरी यांच्या घराचे कूलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ३२,००० रुपये किमतीचे दोन टीव्ही चोरून नेले. ही घटना ६ ऑगस्ट २०२४ रोजी मध्यरात्री घडली. कळंब पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुळजापूर: तुळजापूर येथील सिंदफळ झोपडपट्टीमध्ये अशा औताडे यांच्या घराचे कूलूप तोडून अनिकेत औताडे याने ५० किलो गहू आणि ३०,००० रुपये रोख चोरून नेले. ही घटना ४ ऑगस्ट २०२४ रोजी रात्री ८ वाजता घडली. तुळजापूर पोलीस ठाण्यात अनिकेत औताडे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धाराशिव जिल्ह्यात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. नागरिकांनी आपल्या घरांची सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.