उमरगा – उमरगा तालुक्यातील पूर्व माडज येथे घडलेल्या अपहरण प्रकरणी तब्बल पाच महिन्यांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रेमनाथ उर्फ बब्रुवान फुकटे (रा. माडज, ता. उमरगा) याने महेश उर्फ माउली गायकवाड (वय 49, रा. पूर्व माडज) यांना ट्रक घेऊन नाशिकला जायचे आहे, असे सांगून बळजबरीने सोबत नेल्याचा आरोप आहे.
फिर्यादी सरोजा महेश उर्फ माउली गायकवाड (वय 40) यांनी उमरगा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, 21 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री आठ वाजता हा प्रकार घडला. त्यानंतर तब्बल पाच महिन्यांनी, 26 फेब्रुवारी 2025 रोजी सरोजा गायकवाड यांनी फिर्याद दिल्यानंतर उमरगा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 140(3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमागील नेमके कारण काय आहे, आरोपीने गायकवाड यांना कुठे नेले व पुढे काय झाले, याबाबत अधिक तपास सुरू आहे. उमरगा पोलीस पुढील तपास करत आहेत.
अधिक माहिती:
- अपहृत व्यक्तीचे नाव: महेश उर्फ माउली बाबुराव गायकवाड
- वय: ४९ वर्षे
- राहण्याचे ठिकाण: माडज, ता. उमरगा, जि. धाराशिव
- आरोपीचे नाव: प्रेमनाथ उर्फ बब्रुवान फुकटे
- तारीख: २१ ऑक्टोबर, २०२४
- वेळ: सायंकाळी ८:०० वाजता
- गुन्हा दाखल दिनांक : २६ फेब्रुवारी, २०२५
- कलम: भा.न्या.सं.कलम 140(3)