नळदुर्ग: मागील गो तस्करीच्या कारवाईचा राग मनात धरुन नळदुर्ग बसस्थानकावर एका तरुणाला मारहाण झाल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश शिवराज मुळे (वय २० वर्षे, रा. अणदुर, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांनी याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मुजमील शब्बीर कुरेशी, गौस कुरेशी, सलमान राजु कुरेशी आणि इतर 6 जणांविरुद्ध (सर्व रा. नळदुर्ग) गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ही घटना २६ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३.२० च्या सुमारास घडली. मुळे यांचा मित्र शिवराज निवृत्ती बोंगरगे यांच्यावर मागील गो तस्करीच्या कारवाईचा राग मनात धरुन आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली.
गणेश मुळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, नळदुर्ग पोलिसांनी भा.न्या.सं.कलम 115(2),352,351(3), 189(2),190,191(2) अन्वये गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.