• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, September 26, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

उमरग्यातील कोथळीत धाडसी घरफोडी; दीड लाखांचे दागिने लंपास

admin by admin
July 4, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

मुरुम –  उमरगा तालुक्यातील कोथळी येथे एका बंद घराच्या दरवाजाच्या कुलुपाची कडी कापून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करत सुमारे दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. ही धाडसी चोरी ३० जूनच्या मध्यरात्री घडली असून, याप्रकरणी मुरुम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नीळकंठ बाबुराव कोट्टरगे (वय ३८, रा. कोथळी, ता. उमरगा) असे फिर्यादीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोट्टरगे यांचे कोथळी येथील घर ३० जून २०२५ रोजी रात्री बंद होते. मध्यरात्री दीड ते सकाळी सात वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य गेटच्या आणि दरवाजाच्या कुलुपाची कडी कटरसारख्या हत्याराने कापून घरात प्रवेश केला.

घरात कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी कपाटातील २१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. या दागिन्यांची एकूण किंमत १,४८,९५० रुपये असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घरी परतल्यावर चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर नीळकंठ कोट्टरगे यांनी गुरुवारी, ३ जुलै रोजी मुरुम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

त्यांच्या फिर्यादीवरून मुरुम पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(४) आणि ३०५ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Previous Post

कळंबमध्ये दिवसाढवळ्या घरफोडी; तीन लाखांहून अधिक किमतीचा ऐवज लंपास

Next Post

उमरग्यातील वरनाळवाडीत शेतकरी हवालदिल; रात्रीतून २.३० लाखांच्या ४० शेळ्या चोरीला

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

उमरग्यातील वरनाळवाडीत शेतकरी हवालदिल; रात्रीतून २.३० लाखांच्या ४० शेळ्या चोरीला

ताज्या बातम्या

‘माझं नाव घेतल्याशिवाय त्यांना करमतच नाही’; ओमराजेंचा राणा पाटलांवर थेट हल्लाबोल!

गाडीत शेजारी बसून लाचारीचा आव, पाठीमागे मात्र काळ्या पैशातून पुत्राची ‘ट्रोल गँग’; राणा पाटलांचा मुखवटा ओमराजेंनी टराटरा फाडला!

September 26, 2026
टेबलावरचे ‘सोयाबीन’, शेतकऱ्यांना धक्के अन् साहेबांचे ४० हजारांचे नवे ‘विमा’ गाजर!

टेबलावरचे ‘सोयाबीन’, शेतकऱ्यांना धक्के अन् साहेबांचे ४० हजारांचे नवे ‘विमा’ गाजर!

September 26, 2026
ज्ञानाच्या देवतेला बकऱ्यांचा नैवेद्य! नवसाची ‘सटवाई’ निघाली साक्षात ‘सरस्वती’

ज्ञानाच्या देवतेला बकऱ्यांचा नैवेद्य! नवसाची ‘सटवाई’ निघाली साक्षात ‘सरस्वती’

September 26, 2026
धाराशिव: मांडवा येथे मध्यरात्री पोलिसांची धाडसी कारवाई; १७ लाखांच्या मुद्देमालासह २२ जुगारी गजाआड

धाराशिव: मांडवा येथे मध्यरात्री पोलिसांची धाडसी कारवाई; १७ लाखांच्या मुद्देमालासह २२ जुगारी गजाआड

September 25, 2026
उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

गणेशोत्सवात शांतता राखण्यासाठी धाराशिव पोलिसांचा दणका; ५ ठाण्यांतील १२४ सराईत गुन्हेगारांना तालुक्यांतून हद्दपारीचे आदेश

September 24, 2026

Recent Posts

  • गाडीत शेजारी बसून लाचारीचा आव, पाठीमागे मात्र काळ्या पैशातून पुत्राची ‘ट्रोल गँग’; राणा पाटलांचा मुखवटा ओमराजेंनी टराटरा फाडला!
  • टेबलावरचे ‘सोयाबीन’, शेतकऱ्यांना धक्के अन् साहेबांचे ४० हजारांचे नवे ‘विमा’ गाजर!
  • ज्ञानाच्या देवतेला बकऱ्यांचा नैवेद्य! नवसाची ‘सटवाई’ निघाली साक्षात ‘सरस्वती’
  • धाराशिव: मांडवा येथे मध्यरात्री पोलिसांची धाडसी कारवाई; १७ लाखांच्या मुद्देमालासह २२ जुगारी गजाआड
  • गणेशोत्सवात शांतता राखण्यासाठी धाराशिव पोलिसांचा दणका; ५ ठाण्यांतील १२४ सराईत गुन्हेगारांना तालुक्यांतून हद्दपारीचे आदेश
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!