• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, August 10, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

उमरगा नगर परिषदेच्या कचरा वाहन प्रकरणाला वेग

 नगराध्यक्षांकडून मुख्याधिकाऱ्यांकडे अहवालाची मागणी

admin by admin
July 31, 2026
in धाराशिव जिल्हा
Reading Time: 1 min read
उमरगा नगर परिषदेच्या कचरा वाहन प्रकरणाला वेग
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

उमरगा | उमरगा नगर परिषदेच्या कचरा वाहतूक वाहनाच्या कथित अनधिकृत वापराच्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. सामाजिक कार्यकर्ते तथा ॲड. शीतल चव्हाण यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर आणि धाराशिव लाईव्हने या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करत सविस्तर वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर नगराध्यक्ष किरण गायकवाड यांनी मुख्याधिकारी यांच्याकडून संपूर्ण घटनेचा सविस्तर अहवाल मागविण्याचे निर्देश दिले आहेत.

नगर परिषदेचे कचरा वाहतूक करणारे अधिकृत वाहन शहराबाहेर आढळल्याची तसेच त्याचा वापर कथित चोरीच्या घटनेत झाल्याची माहिती समोर आल्यानंतर ॲड. शीतल चव्हाण यांनी या प्रकरणाकडे केवळ चोरीचा विषय म्हणून न पाहता, सार्वजनिक मालमत्तेच्या वापराबाबतचा गंभीर प्रश्न म्हणून लक्ष वेधले. शहरातील नागरिकांना नियमित कचरा संकलनाची सेवा मिळत नसताना नगर परिषदेचे अधिकृत वाहन शहराबाहेर कोणत्या कारणासाठी गेले, कोणाच्या आदेशाने गेले आणि त्याचा वापर नेमका कशासाठी करण्यात आला, याबाबत प्रशासनाने स्पष्टीकरण द्यावे, अशी त्यांनी मागणी केली.

या विषयाची धाराशिव लाईव्हनेही गांभीर्याने दखल घेत सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर हे प्रकरण शहरभर चर्चेचा विषय ठरले आणि प्रशासनालाही त्याची गंभीर दखल घ्यावी लागली.

या घडामोडीनंतर नगराध्यक्ष किरण गायकवाड यांनी मुख्याधिकारी यांच्याकडून संपूर्ण घटनेचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देणारे पत्र जारी केले आहे. त्यामुळे या प्रकरणाची अधिकृत चौकशी होऊन वस्तुस्थिती समोर येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

याबाबत प्रतिक्रिया देताना ॲड. शीतल चव्हाण म्हणाले, “सार्वजनिक मालमत्ता ही जनतेची असून तिच्या वापराबाबत पूर्ण पारदर्शकता असणे आवश्यक आहे. कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा प्रशासन कायद्यापेक्षा मोठे नाही. नागरिकांनी तथ्यांच्या आधारे प्रश्न उपस्थित केले आणि निष्पक्ष पत्रकारितेने त्याला योग्य व्यासपीठ दिले, तर प्रशासनालाही उत्तरदायी व्हावे लागते.”

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात नागरिकांनी उपस्थित केलेले प्रश्न, ॲड. शीतल चव्हाण यांनी केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि धाराशिव लाईव्हने केलेली निष्पक्ष पत्रकारिता यामुळे प्रशासनाला अधिकृत अहवाल मागवावा लागल्याची चर्चा शहरात सुरू आहे. निर्भीड नागरिक आणि जबाबदार पत्रकारिता यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे लोकशाही अधिक सक्षम होत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Previous Post

औराद येथील वायर चोरीत घंटागाडीचा वापर; नगराध्यक्ष किरण गायकवाड ॲक्शन मोडवर!

Next Post

बसवराज पाटील यांच्या सत्काराच्या निमित्ताने निष्ठावंत भाजप नेत्यांचे शक्तीप्रदर्शन?

Next Post
बसवराज पाटील यांच्या सत्काराच्या निमित्ताने निष्ठावंत भाजप नेत्यांचे शक्तीप्रदर्शन?

बसवराज पाटील यांच्या सत्काराच्या निमित्ताने निष्ठावंत भाजप नेत्यांचे शक्तीप्रदर्शन?

ताज्या बातम्या

धाराशिव कृषी निविष्ठा घोटाळा : कोणते अधिकारी निलंबित?

धाराशिव कृषी निविष्ठा घोटाळा: १४ अधिकाऱ्यांचे निलंबन, मात्र २९ शेतकरी उत्पादक आणि २ निर्मिती कंपन्यांना ‘राजाश्रय’

August 10, 2026
तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

३६ महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई द्या

August 9, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

कळंब बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठन लंपास

August 9, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिव तालुक्यात गायी विक्रीच्या बहाण्याने शेतकऱ्याची फसवणूक!

August 9, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

मागील भांडणाचा राग मनात धरून अचलेर येथे एकास मारहाण; मुरुम पोलिसांत ८ जणांवर गुन्हा दाखल

August 9, 2026

Recent Posts

  • धाराशिव कृषी निविष्ठा घोटाळा: १४ अधिकाऱ्यांचे निलंबन, मात्र २९ शेतकरी उत्पादक आणि २ निर्मिती कंपन्यांना ‘राजाश्रय’
  • ३६ महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई द्या
  • कळंब बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठन लंपास
  • धाराशिव तालुक्यात गायी विक्रीच्या बहाण्याने शेतकऱ्याची फसवणूक!
  • मागील भांडणाचा राग मनात धरून अचलेर येथे एकास मारहाण; मुरुम पोलिसांत ८ जणांवर गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!