धाराशिव – तक्रारदार यांच्या बहिणीचे नावाचे बोनाफाईड सर्टीफिकेट व निर्गम उतारा देण्याकरीता सहा हजार लाचेची मागणी करून, ५ हजार ८०० रुपये लाच घेताना मुरुम येथील डॅा. झाकीर हुसेन उर्दु हायस्कूलचे मुख्याध्यापक आणि एका शिक्षक एसीबी पथकाच्या जाळ्यात अडकले आहेत.
याप्रकरणी 1) सईद अहमद मोहम्मद मकबुल अहमद, वय 57 वर्षे, पद-मुख्याध्यापक, डॅा. झाकीर हुसेन उर्दु हायस्कूल, मुरुम, ता. उमरगा, जि. धाराशीव. रा.मुरुम, ता. उमरगा, जि. धाराशीव (वर्ग-3). 2) शहाजहान अब्दुल खय्युम पटेल, वय-54 वर्षे, पद-सहशिक्षक डॅा. झाकीर हुसेन उर्दु हायस्कूल, मुरुम, ता. उमरगा, जि. धाराशीव. रा. 359, मुस्लीम पाच्छापेठ, नुरानी मस्जीदजवळ, सोलापुर. (वर्ग-3) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील तक्रारदार – पुरुष ( वय 41 वर्षे ) यांच्या बहिणीचे नावाचे बोनाफाईड सर्टीफिकेट व निर्गम उतारा देण्याकरीता यातील आरोपी सईद अहमद मोहम्मद मकबुल अहमद, वय 57 वर्षे, यांनी तक्रारदार यांच्याकडे दि. 28/03/2024 रोजी पंचांसमक्ष 6000/-रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 5800/- रुपये लाच रक्कम स्विकारण्याचे मान्य केले व आज रोजी आरोपी क्रमांक ०१ यांचे सांगणेवरुन आरोपी क्रमांक ०२ शहाजहान अब्दुल खय्युम पटेल, वय-54 वर्षे, याने पंचांसमक्ष 5800/- रुपये लाच रक्कम स्वीकारली असता दोन्ही आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले असुन पोलीस स्टेशन मुरुम, ज़िल्हा धाराशिव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.
हा सापळा अधिकारी -नानासाहेब कदम, पोलिस निरीक्षक, पोलीस अमलदार दिनकर उगलमुगले, सिध्देश्वर तावसकर, आशीष पाटील, अविनाश आचार्य, दत्तात्रय करडे यांनी रचला होता.
लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर खालील नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. कार्यालय 02472 222879* टोल फ्री क्रमांक.1064