• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, October 18, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

वाशीत पवनचक्कीच्या वीजवाहिनीवर चोरट्यांचा डल्ला; १० लाखांच्या तारा चोरीला, ८७ लाखांचे नुकसान

सेरेंटिक रिन्युएबल इंडिया कंपनीला मोठा फटका; वाशी पोलिसांत गुन्हा दाखल

admin by admin
April 3, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

वाशी : येथील सेरेंटिक रिन्युएबल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या पवनचक्की प्रकल्पातील वीजवाहिनीच्या ॲल्युमिनियम तारा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत १० लाख ३३ हजार रुपयांच्या तारा चोरीला गेल्या असून, या तोडफोडीत कंपनीचे तब्बल ८७ लाख १३ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी गुरुवारी (ता. २) वाशी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ सप्टेंबर २०२५ ते १३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत वाशी परिसरातील पवनचक्की प्रकल्पावर ही मोठी चोरी झाली आहे. सेरेंटिक रिन्युएबल इंडिया प्रा. लि. कंपनीच्या पवनचक्कीच्या उभ्या पोलवरील ३३ केव्ही इलेक्ट्रिक डॉग लाईनची (१०३ स्क्वेअर एमएम) तब्बल ३७ हजार ६०० मीटर लांबीची ॲल्युमिनियम तार आणि पँथर लाईनची (२५३ स्क्वेअर एमएम) १७ हजार ८ मीटर लांबीची ॲल्युमिनियम तार अज्ञात व्यक्तींनी कापून चोरून नेली.

या धाडसी चोरीत एकूण १० लाख ३३ हजार ९६२ रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. विशेष म्हणजे, चोरट्यांनी या तारा चोरून नेताना पवनचक्कीवरील इतर ॲल्युमिनियम तारांचे आणि इन्सुलेटरचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. या नुकसानीचा आकडा तब्बल ८७ लाख १३ हजार ८३४ रुपये इतका असल्याचा अंदाज कंपनीने वर्तवला आहे.

याप्रकरणी कंपनीचे प्रतिनिधी रोहित शंकर नेटके (रा. भिसरे, ता. करमाळा, जि. सोलापूर, ह. मु. विकास नगर, धाराशिव) यांनी गुरुवारी (ता. २ एप्रिल) वाशी पोलिस ठाण्यात प्रथम खबर दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३ (२), ३२४ (५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या चोरीमुळे आणि नुकसानीमुळे खळबळ उडाली असून, वाशी पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Previous Post

धाराशिवमध्ये ६६ लाखांची कच्ची सुपारी भरलेला टेम्पो चोरीला

Next Post

शाळेची वही आणली नाही म्हणून १३ वर्षीय विद्यार्थ्याला लाकडी काठीने बेदम मारहाण

Next Post
शाळेची वही आणली नाही म्हणून १३ वर्षीय विद्यार्थ्याला लाकडी काठीने बेदम मारहाण

शाळेची वही आणली नाही म्हणून १३ वर्षीय विद्यार्थ्याला लाकडी काठीने बेदम मारहाण

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव जिल्ह्यात अपहरणाच्या दोन घटना; ढोकीत ५२ वर्षीय व्यक्ती तर आनंदनगरमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता

October 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : ‘आमच्याकडे रागाने का बघतोस?’ म्हणून २४ वर्षीय तरुणावर कोयता, काठी अन् बेल्टने हल्ला

October 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

खामसवाडी : प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून कॉम्प्युटर सेंटरचालकावर चाकू अन् लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला

October 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

जळकोट शिवार : शेतीच्या वादातून रक्तरंजित थरार; चाकू व दगडाने प्राणघातक हल्ला करून तरुणाला केले गंभीर जखमी

October 17, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

भंडारी शिवार : हॉटेलमध्ये नेहमी रागावल्याचा मनात धरला राग; ओडिशातून आलेल्या वेटरने डोक्यात वार करून मालकाचाच केला निर्घृण खून

October 17, 2026

Recent Posts

  • धाराशिव जिल्ह्यात अपहरणाच्या दोन घटना; ढोकीत ५२ वर्षीय व्यक्ती तर आनंदनगरमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता
  • उमरगा : ‘आमच्याकडे रागाने का बघतोस?’ म्हणून २४ वर्षीय तरुणावर कोयता, काठी अन् बेल्टने हल्ला
  • खामसवाडी : प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून कॉम्प्युटर सेंटरचालकावर चाकू अन् लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला
  • जळकोट शिवार : शेतीच्या वादातून रक्तरंजित थरार; चाकू व दगडाने प्राणघातक हल्ला करून तरुणाला केले गंभीर जखमी
  • भंडारी शिवार : हॉटेलमध्ये नेहमी रागावल्याचा मनात धरला राग; ओडिशातून आलेल्या वेटरने डोक्यात वार करून मालकाचाच केला निर्घृण खून
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!