तुळजापुरात उघडकीस आलेल्या ड्रग्ज प्रकरणात आता मोठे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे. उद्यापासून मुंबईत विधी मंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असून, विरोधी पक्षाच्या आमदारांनी या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घ्यावी, अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे.
तुळजापुरातील ड्रग्ज नेटवर्कने संपूर्ण शहर आणि तरुण पिढीला वेढून टाकले असतानाही अनेक नेते आणि विरोधी आमदार शांत का आहेत?
- या मुद्द्यावर विधी मंडळात सरकारला सवाल केला जाणार का?
- राजकीय वरदहस्त असलेल्या नेत्यांची नावे सभागृहात घेतली जाणार का?
- मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना ‘बडे मासे’ अटक करण्यासाठी थेट आदेश देण्यास भाग पाडले जाणार का?
‘बडे मासे’ कधी गळाला लागणार?
सध्या सहा आरोपींना अटक करण्यात आली असली तरी, हे केवळ प्यादे आहेत.
- ड्रग्जच्या नेटवर्कचा मूळ मास्टरमाइंड आणि राजकीय गॉडफादर अजूनही मोकाट फिरत आहेत.
- पोलिसांनी फक्त छोट्या खेळाडूंवर कारवाई करून प्रकरण मिटवायचे ठरवले का?
- परंड्यातील ‘हाजी मस्तान’ अजूनही फरार आहे, त्याला पाठीशी घालणाऱ्या नेत्यांवर कारवाई कधी?
पोलिसांचे संरक्षण मिळाले की सौदेबाजी झाली?
तुळजापुरातील ड्रग्ज व्यवसाय फोफावण्यात स्थानिक पोलिसांचा हातभार होता का? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
- आरोपींना वर्षानुवर्षं पाठीशी घालणाऱ्या पोलीस निरीक्षकावर कारवाई होणार का?
- त्याच्या नेमणुकीचा तपशील आणि त्याच्या कार्यकाळात वाढलेले गुन्हे याची चौकशी होणार का?
- पोलीस दलातील ‘अंदरखाने सौदेबाजी’ उघड होईल का?
मुख्यमंत्री आणि गृहमंत्री कारवाई करणार का?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ड्रग्जविरोधात कठोर भूमिका घेतली आहे.
“ड्रग्ज प्रकरणात पोलिसांचा सहभाग आढळल्यास थेट बडतर्फी होईल!”
मग तुळजापुरातील ड्रग्ज तस्करांना संरक्षण देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर लगेच कारवाई का होत नाही?
आता जनतेचा सवाल:
1️⃣ विधी मंडळात ‘ड्रग्ज प्रकरण’ उपस्थित होणार का?
2️⃣ पोलिसांना ‘बडे मासे’ अटक करण्याचे स्पष्ट आदेश दिले जाणार का?
3️⃣ आरोपींना पाठीशी घालणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का?
आता लक्ष असेल, विधी मंडळाच्या अधिवेशनात हा मुद्दा किती गाजतो आणि सरकार यावर कोणते ठोस पाऊल उचलते!