येरमाळा पोलीस ठाण्यात दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी सचिन कदम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दत्ता गायकवाड, नितीन कांबळे आणि विनोद गायकवाड या तिघांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक 24 सप्टेंबर रोजी सकाळी 11:30 वाजता एरंडगाव येथे म्हैस रोडच्या कडेला म्हैस बांधण्यावरून वाद झाला. या वादात आरोपींनी सचिन कदम यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी, लोखंडी गज आणि काठीने मारहाण केली. तसेच, वाद सोडवण्यासाठी आलेल्या कदम यांच्या आई-वडिलांनाही आरोपींनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम 109, 352, 351(2), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण, वाशी पोलिसांकडून गुन्हा दाखल
ईट गावात शेतीच्या वादातून एका व्यक्तीला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आश्रु दादाराव थोरात (वय ३५, रा. ईट) यांना श्रीमंत उर्फ बाबा रमेश भोसले, रोशन रमेश भोसले (दोघे रा. ईट), आण्णा साळुंखे (रा. डोकेवाडी) आणि सुनिल देशमुख (रा. ईट) यांनी २३ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते ११ च्या दरम्यान मारहाण केली. आरोपींनी थोरात यांना जातीवाचक शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच दगड, काठी आणि लोखंडी गजाने मारहाण करून त्यांना जखमी केले. यावेळी आरोपींनी थोरात यांच्या गळ्यातील पाच तोळ्याची चैन आणि पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी हिसकावून घेतली आणि त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. थोरात यांनी २६ सप्टेंबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून वाशी पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम 119(1), 118(1), 115(2), 352, 351(3), 3(5), सह अ.जा.अ.ज.प्र.का. कलम 3(1) (आर)(एस)(व्हीए), 3 (2) (5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.