मुरुम – येथील गणेश नगर येथे राहणाऱ्या देवप्पा दत्तु कुंभार (वय ३०) यांनी २८ जुलै २०२४ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेच्या एक दिवसानंतर, मृत देवप्पा यांचे वडील दत्तु सातप्पा कुंभार यांनी मुरुम पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
फिर्यादीत नमूद केल्यानुसार, नेहरू नगरमधील मल्लीनाथ हणमंत पुराणे, मलम्मा हणमंत पुराणे आणि सुनिल हणमंत पुराणे यांनी देवप्पा यांना शिवीगाळ करून मारहाण केली होती. या घटनेमुळे उद्भवलेल्या त्रासामुळे देवप्पा यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले.पोलिसांनी या प्रकरणी भादंवि कलम १०८, ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.