उमरगा – बलसुर येथे दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी रात्री 8:15 वाजता असद कबीर शेख (वय 27 वर्षे) या तरुणावर तीन आरोपींनी हल्ला केला. आरोपी मुसा दस्तगीर तांबोळी, इरफान मुसा तांबोळी आणि पाशा दस्तगीर तांबोळी यांनी मागील भांडणाच्या कारणावरून शेख यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी, बतईने मारहाण केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली.
आरोपी नामे- मुसा दस्तगीर तांबोळी, इरफान मुसा तांबोळी, पाशा दस्तगीर तांबोळी रा. बलसुर ता. उमरगा यांनी दि. 20.09.2024 रोजी 20.15 वा. सु. उमरगा ते सास्तुर जाणारे रोडलगत गोलंदाज मोबाईल शॉप चांदणी चौक बलसुर येथे फिर्यादी नामे-असद कबीर शेख, वय 27 वर्षे, रा.बरकत मस्जीदच्या पाठीमागे बलसुर ता. उमरगा जि. धाराशिव ह.मु. वेताळ वसाहत चाळ क्र 231 उन्नती नगर हाडपसर गाडीतळ पुणे यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, बतईने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-असद शेख यांनी दि.21.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 118(1), 115(2), 352, 351(2)(3) 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे