• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, November 2, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

भूम: अवैध वाळू उपसा रोखणाऱ्या महसूल पथकावर दगडफेक; १० जणांवर गुन्हा दाखल

admin by admin
May 3, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

भूम –  तालुक्यातील साडेसांगवी शिवारात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकावर दगडफेक करून शासकीय कामात अडथळा आणल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भुमचे नायब तहसीलदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जेसीबी चालक, टिप्पर चालक यांच्यासह सुमारे दहा अज्ञात व्यक्तींविरुद्ध भुम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भुमचे नायब तहसीलदार प्रवीण दिलीप जाधव (वय ३१) हे १ मे २०२५ रोजी मध्यरात्री १२:०५ ते १:०० वाजण्याच्या सुमारास आपल्या पथकासह साडेसांगवी शिवारातील आण्णा मासाळ यांच्या घराजवळील बाणगंगा नदी पात्रात गस्त घालत होते. यावेळी नदीपात्रातून सुमारे २० ब्रास अवैध वाळू (अंदाजे किंमत १,२०,००० रुपये) चोरून नेणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचा प्रयत्न पथकाने केला.

मात्र, यावेळी उपस्थित जेसीबी चालक, टिप्पर चालक आणि इतर सुमारे दहा अनोळखी इसमांनी एकत्र येऊन नायब तहसीलदार जाधव व त्यांच्या पथकावर दगडफेक केली. या हल्ल्यामुळे पथकाला कारवाई मागे घ्यावी लागली आणि शासकीय कामात अडथळा निर्माण झाला.

या घटनेप्रकरणी नायब तहसीलदार प्रवीण जाधव यांनी २ मे २०२५ रोजी भुम पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी जेसीबी चालक, टिप्पर चालक आणि इतर दहा अनोळखी व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम १३२ (चोरी), १२५ (शासकीय कामात अडथळा), ३०३(२) (गंभीर दुखापत किंवा हल्ला), १८९(२) (बेकायदेशीर जमाव), १९१(२) (दंगल), १९० (सरकारी कर्मचाऱ्यास धाक दाखवणे) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. भुम पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Previous Post

धारूरमध्ये जुन्या वादातून तरुणाला मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

धाराशिव रस्ता कामांबाबत आंदोलनाला यश; अंदाजपत्रक दरानेच निविदा मंजूर करा, अन्यथा फेरनिविदा – शासनाचे आदेश

Next Post
धाराशिव रस्ता कामांबाबत आंदोलनाला यश; अंदाजपत्रक दरानेच निविदा मंजूर करा, अन्यथा फेरनिविदा – शासनाचे आदेश

धाराशिव रस्ता कामांबाबत आंदोलनाला यश; अंदाजपत्रक दरानेच निविदा मंजूर करा, अन्यथा फेरनिविदा - शासनाचे आदेश

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

कौटुंबिक वादातून पत्नी व सासऱ्यावर चाकूने हल्ला; परंड्यात पतीविरुद्ध गुन्हा

November 2, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या चार घटना; म्हशी, स्कुटी, मोबाईल आणि दुचाकी लंपास

November 2, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरग्यात विनापरवाना लोखंडी कोयता बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल

November 1, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

नंदगाव शिवारात २४ एकर सोयाबीनच्या बनीमला आग; शेतकऱ्याचे ११ लाखांचे नुकसान

November 1, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

परंड्यात ४२ कामगारांना डांबून ठेवून १६ ते १७ तास काम; मारहाण, धमकी देत मोबदला न दिल्याचा आरोप

November 1, 2026

Recent Posts

  • कौटुंबिक वादातून पत्नी व सासऱ्यावर चाकूने हल्ला; परंड्यात पतीविरुद्ध गुन्हा
  • धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या चार घटना; म्हशी, स्कुटी, मोबाईल आणि दुचाकी लंपास
  • उमरग्यात विनापरवाना लोखंडी कोयता बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल
  • नंदगाव शिवारात २४ एकर सोयाबीनच्या बनीमला आग; शेतकऱ्याचे ११ लाखांचे नुकसान
  • परंड्यात ४२ कामगारांना डांबून ठेवून १६ ते १७ तास काम; मारहाण, धमकी देत मोबदला न दिल्याचा आरोप
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!