• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, June 28, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवमध्ये घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

admin by admin
June 17, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिवमध्ये घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
0
SHARES
1.6k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: शहरात घरगुती गॅस सिलेंडरमधून बेकायदेशीरपणे गॅस काढून त्याचा काळाबाजार करणाऱ्या एका रॅकेटचा पर्दाफाश करण्यात धाराशिव शहर पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी दोघांना अटक केली असून, त्यांच्याकडून एकूण ६०,७७० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिस निरीक्षक एस. एस. शेख यांना १६ जून २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास एका गोपनीय सूत्राकडून माहिती मिळाली. धाराशिव शहरातील पाथरुड चौकाजवळील नाल्यालगत असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये काही इसम घरगुती सिलेंडरमधील गॅस बेकायदेशीरपणे वाहनांमध्ये भरून काळाबाजार करत होते. 

माहितीची खातरजमा होताच, पोलीस निरीक्षक शेख यांनी तात्काळ तहसील कार्यालयाशी संपर्क साधला.  तेथील पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार ए. पी. बाहेकर यांना सोबत घेऊन पोलिसांच्या पथकाने त्याच दिवशी सायंकाळी ७:३० वाजता छापा टाकला. घटनास्थळी शकील कासिमसाब तांबोळी आणि जावेद शकील तांबोळी (दोघे रा. सांजा वेस गल्ली, धाराशिव) हे रंगेहाथ सापडले. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी खालील मुद्देमाल जप्त केला आहे:

  • ११ भरलेले घरगुती गॅस सिलेंडर: एचपी कंपनीचे, अंदाजे किंमत ३३,७७० रुपये. 
  • १० रिकामे घरगुती गॅस सिलेंडर: एचपी कंपनीचे, अंदाजे किंमत २२,००० रुपये. 
  • १ इलेक्ट्रिक मोटार: गॅस भरण्यासाठी वापरण्यात येणारी, अंदाजे किंमत ४,००० रुपये. 
  • १ इलेक्ट्रॉनिक वजन काटा: रिलायन्स वेट मास्टर कंपनीचा, अंदाजे किंमत १,००० रुपये. 

या दोन्ही आरोपींविरुद्ध धाराशिव शहर पोलीस ठाण्यात अत्यावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना आणि उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात पोलीस निरीक्षक एस. एस. शेख, नायब तहसीलदार ए. पी. बाहेकर, सपोनि रवींद्र अंभोरे, पोलीस उपनिरीक्षक अक्षय डिघोळे, श्रेणी पो. उपनिरीक्षक देविदास हावळे आणि पोलीस अंमलदार चक्रधर पाटील, हुसेन सय्यद, राशीद पठाण, पवन नागरगोजे, रिजवान बेग यांचा समावेश होता. 

 

Previous Post

धाराशिवच्या राजकारणात नवा ‘कलगीतुरा’: आ. राणा पाटलांच्या ‘आयडिया’वर पालकमंत्र्यांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’!

Next Post

९३ वर्षांचं प्रेम, सोनं-नाणं फिकं पाडणारा प्रामाणिकपणा; डोळ्यात पाणी आणणाऱ्या आजोबा-आजींच्या व्हायरल व्हिडिओची गोष्ट!

Next Post
९३ वर्षांचं प्रेम, सोनं-नाणं फिकं पाडणारा प्रामाणिकपणा; डोळ्यात पाणी आणणाऱ्या आजोबा-आजींच्या व्हायरल व्हिडिओची गोष्ट!

९३ वर्षांचं प्रेम, सोनं-नाणं फिकं पाडणारा प्रामाणिकपणा; डोळ्यात पाणी आणणाऱ्या आजोबा-आजींच्या व्हायरल व्हिडिओची गोष्ट!

ताज्या बातम्या

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

वाशी तालुक्यात धाडसी घरफोडी; बंद घराचे कुलूप तोडून अडीच लाखांचे दागिने लंपास

June 28, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

परंड्यात गाडीचा फोकस जास्त लावल्याच्या कारणावरून तरुणाला मारहाण

June 28, 2025
चिंचपूरच्या शाळेत शिक्षकच दारूच्या नशेत हजर; ग्रामस्थांनी केली व्हिडिओ शूटिंग

चिंचपूरच्या शाळेत शिक्षकच दारूच्या नशेत हजर; ग्रामस्थांनी केली व्हिडिओ शूटिंग

June 28, 2025
नामरंगी रंगले भक्त, विठ्ठल भेटीचा मार्ग सोपा

नामरंगी रंगले भक्त, विठ्ठल भेटीचा मार्ग सोपा

June 28, 2025
अर्थांच्या आत्महत्येला आव्हान देणारी कवयित्री: सुनीता झाडे

अर्थांच्या आत्महत्येला आव्हान देणारी कवयित्री: सुनीता झाडे

June 27, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group