• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, September 22, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजापूर विकास आराखडा वादात: ब्रह्मदेवाची मूर्ती भंगल्याने दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

admin by admin
July 12, 2025
in धाराशिव जिल्हा
Reading Time: 1 min read
तुळजापूर विकास आराखडा वादात: ब्रह्मदेवाची मूर्ती भंगल्याने दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर: श्री तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचे काम सुरू होण्यापूर्वीच मंदिर परिसरातील २० उपदेवतांच्या मूर्ती हलवताना प्राचीन श्री ब्रह्मदेवाची मूर्ती निष्काळजीपणामुळे दुभंगली आहे, असा आरोप करत महाराष्ट्र मंदिर महासंघाने यास जबाबदार असणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली आहे. अडीच महिन्यांपूर्वी तक्रार करूनही अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने महासंघाने पत्रकार परिषद घेऊन तीव्र नाराजी व्यक्त केली.

महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत ही मागणी केली. यावेळी हिंदू जनजागृती समिती, पाळेकर पुजारी मंडळ, महंत मंडळ, परमेश्वर भोपे पुजारी मंडळ, हिंदू राष्ट्र सेना आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

श्री. घनवट यांनी सांगितले की, मूर्ती हलवताना ती दुभंगली असून, ती पूर्वीपासूनच भंगलेली होती हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा आहे. मूर्ती पूर्वी अखंड असल्याचे पुरावे उपलब्ध असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई झालीच पाहिजे, असे ते म्हणाले.

विकास आराखड्यावरही अनेक गंभीर आक्षेप नोंदवण्यात आले.

  • मंदिरातील अनादी काळापासून चालत आलेले कुलाचार, वंशपरंपरा आणि धार्मिक विधींसाठी आराखड्यात कोणतीही जागा राखीव ठेवण्यात आलेली नाही, हे हिंदूंच्या श्रद्धेवरील आघात आहे.
  • मुख्य गाभाऱ्यातील सभामंडपाला तडे गेले असून त्याचा जीर्णोद्धार केला जाणार आहे. मात्र, मंदिराच्या मूळ ऐतिहासिक, धार्मिक आणि वास्तुरचनेला धक्का लागणार नाही, याची शासनाने खात्री द्यावी.
  • विकास आराखड्यात पारदर्शकता आणून त्याचे लेखी दस्तऐवज जाहीर करावेत. 
  • आराखड्याला अंतिम स्वरूप देण्यापूर्वी धर्मशास्त्राचे अभ्यासक, धर्माचार्य आणि शंकराचार्य पिठांचे मत विचारात घ्यावे.
  • मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वीप्रमाणेच ठेवून, मागून नवीन दार काढून मंदिराच्या मूळ रचनेत बदल करू नये.

या सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी श्री तुळजापूर संरक्षण कृती समिती, महाराष्ट्र मंदिर महासंघ, हिंदुत्वनिष्ठ संघटना, पुजारी मंडळे आणि स्थानिक ग्रामस्थ यांची जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांनी तातडीने बैठक बोलवावी, अशी ठाम मागणीही यावेळी उपस्थित सर्व संघटनांनी केली.

Previous Post

गंभीर गुन्हा उघडकीस, तुळजाभवानी मंदिराच्या नवनियुक्त जनसंपर्क अधिकाऱ्याची हकालपट्टी

Next Post

धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात मारहाण आणि जीवे मारण्याच्या धमकीप्रकरणी गुन्हा दाखल

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात मारहाण आणि जीवे मारण्याच्या धमकीप्रकरणी गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली

धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली

September 22, 2026
देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद

देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद

September 22, 2026
शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!

September 21, 2026
शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

September 21, 2026
आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

September 20, 2026

Recent Posts

  • धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली
  • देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद
  • उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!
  • शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर
  • आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!