• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, November 4, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यात चोरांचा धुमाकूळ; एकाच दिवशी मोबाईल, दागिन्यांसह २९ लाखांचा मुद्देमाल लंपास

admin by admin
July 16, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – धाराशिव जिल्ह्यात चोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, एकाच दिवशी विविध ठिकाणी मोठ्या घरफोड्या आणि चोऱ्यांच्या घटना घडल्या आहेत. तुळजापूर येथे मोबाईल शॉपी फोडून १३ लाखांचे मोबाईल, तर लोहारा येथे सराफ दुकान फोडून सुमारे ८ लाखांचे चांदी आणि रोकड चोरट्यांनी लंपास केली. यासह नळदुर्ग, ढोकी आणि येरमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतही चोऱ्या झाल्या असून, एकाच दिवशी सुमारे २९ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. या घटनांमुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

तुळजापुरात भिंत फोडून १३ लाखांचे मोबाईल लंपास

तुळजापूर शहरातील खडकाळ गल्ली येथील एस.एस. मोबाईल शॉपीमध्ये १५ जुलै रोजी मध्यरात्री मोठी चोरी झाली. चोरट्यांनी शेजारी असलेल्या लस्सी सेंटरचा पत्रा उचकटून आत प्रवेश केला आणि त्यानंतर मोबाईल शॉपीची भिंत फोडून आत प्रवेश केला. दुकानातून सॅमसंग, ॲपल आयफोनसह विविध कंपन्यांचे एकूण २० मोबाईल फोन चोरट्यांनी चोरून नेले. या चोरीत १३ लाख ३३ हजार ५९१ रुपयांचे नुकसान झाल्याची फिर्याद सचिन नानासाहेब शिंदे यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात दिली आहे.

लोहाऱ्यात सराफ दुकान फोडले

लोहारा शहरातील हिप्परगा रोडवर असलेल्या श्री जयलक्ष्मी माउली ज्वेलर्स या सराफ दुकानाचे चॅनल गेटचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. दुकानातून ८ किलो चांदी आणि ४०,००० रुपयांची रोकड असा एकूण ७ लाख ८१ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. ही घटना १५ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी अविनाश बळीराम फुलसुंदर यांनी लोहारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

जिल्ह्यातील इतर ठिकाणीही चोऱ्या

  • नळदुर्ग: चिवरी येथील महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या इंदुमती सोनवणे (रा. सोलापूर) यांच्या गळ्यातील ३ लाख रुपये किमतीचे चार तोळ्याचे सोन्याचे गंठण गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने चोरून नेले.
  • येरमाळा: येरमाळा येथील एका साईटवरील ट्रान्सफॉर्मरमधून अज्ञात चोरट्याने सुमारे ४ लाख रुपये किमतीची तांब्याची तार चोरून नेल्याची तक्रार ज्ञानोबा मंदाडे यांनी दिली आहे.
  • ढोकी: जवळे दुमाला येथील दोन वेगवेगळ्या गोठ्यांमधून एकूण ७४,००० रुपये किमतीच्या दोन पंढरपुरी म्हशी चोरीला गेल्या आहेत. तसेच, ढोकी शिवारातील एका शेतातून ४३,२०० रुपये किमतीचे बोअरवेलचे पाईप आणि इतर शेती साहित्य चोरीला गेले आहे.

या सर्व प्रकरणांमध्ये संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

Previous Post

ऑनलाइन गेमिंग फसवणुकीचे मोठे रॅकेट उघड; बीड, नांदेडसह पाच जणांवर गुन्हा दाखल

Next Post

गायीच्या तस्करीच्या संशयावरून दोघांना स्टंप-पाईपने बेदम मारहाण; पुणे, सोलापूरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

गायीच्या तस्करीच्या संशयावरून दोघांना स्टंप-पाईपने बेदम मारहाण; पुणे, सोलापूरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना; शाळेतील सोलार बॅटऱ्या, सोन्याचे टॉप्स आणि दोन दुचाकी लंपास

November 4, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव तालुक्यातील कावलदरा येथून २० वर्षीय तरुण बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल

November 4, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उसाच्या बगॅसच्या व्यवहारातून श्रीवर्धन ॲग्रो कारखान्यात राडा; नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

November 4, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

मद्यधुंद अवस्थेचा फायदा घेत धाराशिवमध्ये व्यक्तीला तीन दिवस डांबले

November 4, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

रस्ता अडवून २० लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप; चौघांविरुद्ध वाशी पोलिसांत गुन्हा

November 4, 2026

Recent Posts

  • धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना; शाळेतील सोलार बॅटऱ्या, सोन्याचे टॉप्स आणि दोन दुचाकी लंपास
  • धाराशिव तालुक्यातील कावलदरा येथून २० वर्षीय तरुण बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल
  • उसाच्या बगॅसच्या व्यवहारातून श्रीवर्धन ॲग्रो कारखान्यात राडा; नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
  • मद्यधुंद अवस्थेचा फायदा घेत धाराशिवमध्ये व्यक्तीला तीन दिवस डांबले
  • रस्ता अडवून २० लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप; चौघांविरुद्ध वाशी पोलिसांत गुन्हा
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!