• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, September 19, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

गायीच्या तस्करीच्या संशयावरून दोघांना स्टंप-पाईपने बेदम मारहाण; पुणे, सोलापूरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल

admin by admin
July 16, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

परंडा – ‘तू गायींची तस्करी करतोस’ असा आरोप करत पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील पाच जणांनी मिळून दोघांना दगड, स्टंप आणि पाईपने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना परंडा तालुक्यात उघडकीस आली आहे. या हल्ल्यात दोघे जण जखमी झाले असून, त्यांच्या स्कार्पिओ गाडीचीही तोडफोड करण्यात आली. पीडित व्यक्तीच्या तक्रारीवरून परंडा पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी फिरोज आयुब पठाण (वय ३४, रा. धाराशिव) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १३ जुलै रोजी दुपारी अडीचच्या सुमारास वारदवाडी फाट्या जवळील मायरा हॉटेलसमोर घडली. फिरोज पठाण आणि त्यांचे सहकारी शौकत शेख हे आपल्या स्कार्पिओ गाडीने (क्र. एमएच १४ एव्ही ६२४३) जात असताना आरोपींनी त्यांची गाडी अडवली.

“तू गायीची तस्करी करतोस, तुझी गाडी आमच्या लोकेशनवर असते,” असे म्हणत आरोपींनी गैरकायदेशीर जमाव जमवून दोघांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लाथाबुक्क्या, दगड, क्रिकेटचे स्टंप आणि लोखंडी पाईपने जबर मारहाण केली. यात दोघेही जखमी झाले. इतकेच नाही, तर आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्या गाडीची तोडफोड करून मोठे नुकसान केले.

याप्रकरणी फिरोज पठाण यांनी १५ जुलै रोजी परंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी:

  • विराज सोले (रा. कात्रज, पुणे)
  • परमेश्वर राऊत (रा. मानेगाव, ता. माढा)
  • खंडू जाधव (रा. शेंद्री, ता. बार्शी)
  • योगेश काळे (रा. तांबेवाडी, ता. बार्शी)
  • अण्णा भोसले (रा. नान्नज, जि. सोलापूर)

या पाच जणांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार मारहाण, गैरकायदेशीर जमाव जमवणे, धमकी देणे आणि मालमत्तेचे नुकसान करणे यांसारखे गुन्हे नोंदवले आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Previous Post

धाराशिव जिल्ह्यात चोरांचा धुमाकूळ; एकाच दिवशी मोबाईल, दागिन्यांसह २९ लाखांचा मुद्देमाल लंपास

Next Post

बेंबळीचे उपसरपंच नितीन इंगळे अपात्र: तीन अपत्यांमुळे सदस्यपद रद्द

Next Post
बेंबळीचे उपसरपंच नितीन इंगळे अपात्र: तीन अपत्यांमुळे सदस्यपद रद्द

बेंबळीचे उपसरपंच नितीन इंगळे अपात्र: तीन अपत्यांमुळे सदस्यपद रद्द

ताज्या बातम्या

‘मराठवाड्याची शिवकाशी’ तेरखेड्यातील फटाका उद्योग संशयाच्या भोवऱ्यात!

तेरखेडा फटाका उद्योगाला दणका; ‘भवानी फायर वर्क्स’चे उत्पादन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशापर्यंत बंद!

September 19, 2026
ऐन महालक्ष्मी सणाच्या रात्री धाराशिवमध्ये ‘दडपशाही’! जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटलांच्या हट्टापायी ४० वर्षांचा रस्ता रोखण्यासाठी मध्यरात्री उभारली भिंत

ऐन महालक्ष्मी सणाच्या रात्री धाराशिवमध्ये ‘दडपशाही’! जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटलांच्या हट्टापायी ४० वर्षांचा रस्ता रोखण्यासाठी मध्यरात्री उभारली भिंत

September 19, 2026
पोलिसांची ८ महिने टोलवाटोलव, आगार प्रमुखाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न; एसटी चालकाच्या आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर अखेर FIR

फसवणूक करणारा प्रवासी निघाला मुख्याध्यापक; आगार प्रमुखाने दिली होती थेट परिवहन मंत्र्यांच्या नावाने चालकाला घरी बसवण्याची धमकी!

September 19, 2026
पोलिसांची ८ महिने टोलवाटोलव, आगार प्रमुखाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न; एसटी चालकाच्या आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर अखेर FIR

पोलिसांची ८ महिने टोलवाटोलव, आगार प्रमुखाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न; एसटी चालकाच्या आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर अखेर FIR

September 18, 2026
एसटी बसमध्ये बनावट दिव्यांग कार्ड वापरून फसवणूक; आगार प्रमुखासह प्रवाशाविरुद्ध तुळजापूर पोलिसांत गुन्हा दाखल

एसटी बसमध्ये बनावट दिव्यांग कार्ड वापरून फसवणूक; आगार प्रमुखासह प्रवाशाविरुद्ध तुळजापूर पोलिसांत गुन्हा दाखल

September 18, 2026

Recent Posts

  • तेरखेडा फटाका उद्योगाला दणका; ‘भवानी फायर वर्क्स’चे उत्पादन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशापर्यंत बंद!
  • ऐन महालक्ष्मी सणाच्या रात्री धाराशिवमध्ये ‘दडपशाही’! जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटलांच्या हट्टापायी ४० वर्षांचा रस्ता रोखण्यासाठी मध्यरात्री उभारली भिंत
  • फसवणूक करणारा प्रवासी निघाला मुख्याध्यापक; आगार प्रमुखाने दिली होती थेट परिवहन मंत्र्यांच्या नावाने चालकाला घरी बसवण्याची धमकी!
  • पोलिसांची ८ महिने टोलवाटोलव, आगार प्रमुखाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न; एसटी चालकाच्या आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर अखेर FIR
  • एसटी बसमध्ये बनावट दिव्यांग कार्ड वापरून फसवणूक; आगार प्रमुखासह प्रवाशाविरुद्ध तुळजापूर पोलिसांत गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!