• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, September 18, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवमध्ये अतिवृष्टीने शेती उद्ध्वस्त; कृषिमंत्र्यांच्या दौऱ्यासोबतच पीकविम्याच्या नव्या नियमांचे संकट

'उंबरठा उत्पन्ना'ची अट शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी; नुकसान होऊनही भरपाई मिळण्याचा मार्ग खडतर

admin by admin
August 16, 2025
in शेती - शेतकरी
Reading Time: 1 min read
धाराशिवमध्ये अतिवृष्टीने शेती उद्ध्वस्त; कृषिमंत्र्यांच्या दौऱ्यासोबतच पीकविम्याच्या नव्या नियमांचे संकट
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव –  गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने धाराशिव जिल्ह्यातील कळंब आणि वाशी तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. या अस्मानी संकटामुळे शेतात गुडघाभर पाणी साचले असून, सोयाबीन, उडीद, मूग  यांसारखी हातातोंडाशी आलेली पिके डोळ्यादेखत सडून जात आहेत. या प्रचंड नुकसानीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आज राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे येत आहेत. मात्र, कृषिमंत्र्यांच्या या दौऱ्याने दिलासा मिळण्याऐवजी, पीकविम्याच्या बदललेल्या जाचक नियमांमुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भरच पडली आहे.

कळंब आणि वाशी तालुक्यातील हजारो हेक्टरवरील शेती पावसाच्या पाण्याखाली गेली आहे. शेतकऱ्यांनी कर्ज काढून, रात्रीचा दिवस करून जगवलेली पिके आता मातीमोल झाली आहेत. ‘एन पावसाळ्यात दडी मारली आणि आता काढणीच्या वेळेस पावसाने थैमान घातले, आता आम्ही जगायचं कसं?’ असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहेत. या गंभीर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज नुकसानग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. त्यांच्या दौऱ्यामुळे प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली असून, पंचनाम्याच्या प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता आहे.

मात्र, या शासकीय दौऱ्यापेक्षाही शेतकऱ्यांची चिंता पीकविम्याच्या बदललेल्या नियमांनी वाढवली आहे. यंदाच्या खरीप हंगामापासून पीकविमा नियमावलीत मोठे बदल करण्यात आले असून, पूर्वी असलेले तीन महत्त्वाचे ‘ट्रिगर’ काढण्यात आले आहेत. आता केवळ ‘उंबरठा उत्पन्न’ (Threshold Yield) या एकमेव निकषावर नुकसान भरपाई अवलंबून आहे. या नियमानुसार, संपूर्ण महसूल मंडळाचे सरासरी उत्पन्न जर निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा कमी आले, तरच विमा मंजूर होईल.

यातील सर्वात मोठा धोका हा आहे की, एखाद्या शेतकऱ्याचे वैयक्तिक १०० टक्के नुकसान होऊनही, जर संपूर्ण मंडळाची सरासरी जास्त आली, तर त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्याला विमा कंपनीकडून कवडीचीही मदत मिळणार नाही. “आमच्या डोळ्यादेखत पीक वाया गेलंय, पण मंडळाची सरासरी आमच्या विरोधात गेली तर आम्ही काय करायचं? हा नियम आमच्या जखमेवर मीठ चोळणारा आहे,” अशी उद्विग्न प्रतिक्रिया एका शेतकऱ्याने दिली.

त्यामुळे, कृषिमंत्री येत आहेत हे चांगले असले तरी, त्यांनी केवळ पाहणी आणि आश्वासनांवर न थांबता पीकविम्याच्या या जाचक अटीतून शेतकऱ्यांना दिलासा कसा मिळेल, यावर ठोस तोडगा काढावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. अन्यथा, अस्मानी संकटातून वाचलेला शेतकरी या ‘सुलतानी’ नियमांच्या संकटामुळे उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही.

Previous Post

आभाळ फाटलंय, पण शिवारातलं पाणी डोळ्यात उतरलंय!

Next Post

येडशीमध्ये ‘टायगर ग्रुप’ची गुंडगिरी: पार्किंगच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला, आई-बहिणीलाही अमानुष मारहाण

Next Post
येडशीमध्ये ‘टायगर ग्रुप’ची गुंडगिरी: पार्किंगच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला, आई-बहिणीलाही अमानुष मारहाण

येडशीमध्ये 'टायगर ग्रुप'ची गुंडगिरी: पार्किंगच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला, आई-बहिणीलाही अमानुष मारहाण

ताज्या बातम्या

पोलिसांची ८ महिने टोलवाटोलव, आगार प्रमुखाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न; एसटी चालकाच्या आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर अखेर FIR

पोलिसांची ८ महिने टोलवाटोलव, आगार प्रमुखाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न; एसटी चालकाच्या आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर अखेर FIR

September 18, 2026
एसटी बसमध्ये बनावट दिव्यांग कार्ड वापरून फसवणूक; आगार प्रमुखासह प्रवाशाविरुद्ध तुळजापूर पोलिसांत गुन्हा दाखल

एसटी बसमध्ये बनावट दिव्यांग कार्ड वापरून फसवणूक; आगार प्रमुखासह प्रवाशाविरुद्ध तुळजापूर पोलिसांत गुन्हा दाखल

September 18, 2026
‘मराठवाड्याची शिवकाशी’ तेरखेड्यातील फटाका उद्योग संशयाच्या भोवऱ्यात!

‘मराठवाड्याची शिवकाशी’ तेरखेड्यातील फटाका उद्योग संशयाच्या भोवऱ्यात!

September 17, 2026
‘झेंडा मंत्री’ प्रताप सरनाईकांचा ‘व्हिडिओ कॉल’ दुष्काळ दौरा: उंटावरून शेळ्या हाकण्याचा नवा विक्रम!

‘झेंडा मंत्री’ प्रताप सरनाईकांचा ‘व्हिडिओ कॉल’ दुष्काळ दौरा: उंटावरून शेळ्या हाकण्याचा नवा विक्रम!

September 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : सामाजिक वनीकरण कार्यालयात घुसून वनरक्षकाच्या अंगावर ओतली काळी शाई; शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

September 17, 2026

Recent Posts

  • पोलिसांची ८ महिने टोलवाटोलव, आगार प्रमुखाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न; एसटी चालकाच्या आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर अखेर FIR
  • एसटी बसमध्ये बनावट दिव्यांग कार्ड वापरून फसवणूक; आगार प्रमुखासह प्रवाशाविरुद्ध तुळजापूर पोलिसांत गुन्हा दाखल
  • ‘मराठवाड्याची शिवकाशी’ तेरखेड्यातील फटाका उद्योग संशयाच्या भोवऱ्यात!
  • ‘झेंडा मंत्री’ प्रताप सरनाईकांचा ‘व्हिडिओ कॉल’ दुष्काळ दौरा: उंटावरून शेळ्या हाकण्याचा नवा विक्रम!
  • उमरगा : सामाजिक वनीकरण कार्यालयात घुसून वनरक्षकाच्या अंगावर ओतली काळी शाई; शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!