• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, November 2, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

‘झेंडा मंत्री’ प्रताप सरनाईकांचा ‘व्हिडिओ कॉल’ दुष्काळ दौरा: उंटावरून शेळ्या हाकण्याचा नवा विक्रम!

admin by admin
September 17, 2026
in राजकारण
Reading Time: 1 min read
‘झेंडा मंत्री’ प्रताप सरनाईकांचा ‘व्हिडिओ कॉल’ दुष्काळ दौरा: उंटावरून शेळ्या हाकण्याचा नवा विक्रम!
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव जिल्ह्यात सध्या पावसाने अशी काही दडी मारली आहे की, दुष्काळाने अक्षरशः तळ गाठलाय. गेले दोन महिने पाण्याचा टिपूस नाही, त्यामुळे डोळ्यादेखत उभं सोयाबीनचं पीक करपून गेलंय. शेतकरी हवालदिल होऊन आभाळाकडे डोळे लावून बसलाय. अशा या भीषण परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीवर हात ठेवायला जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री प्रताप सरनाईक साहेब प्रकटले… पण थांबा! ते दुष्काळ बघायला नाही, तर ‘झेंडा’ फडकवायला आले होते.

साहेबांचा धाराशिवचा ‘व्हिसा’ वर्षातून फक्त तीनदाच मंजूर होतो – १५ ऑगस्ट, २६ जानेवारी आणि १७ सप्टेंबर! उरलेले ३६२ दिवस साहेब ठाण्यातूनच धाराशिवचा ‘पालक’ धर्म निभावतात. त्यामुळे धाराशिवकरांना आता एक यक्षप्रश्न पडलाय की, आपले साहेब खरंच ‘पालकमंत्री’ आहेत की फक्त ‘झेंडा मंत्री’?

१७ सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती दिनाचा झेंडा फडकवला आणि माध्यमांचे कॅमेरे पाहताच साहेबांच्या अंगात अचानक दुष्काळ दौऱ्याचं वारं संचारलं. आता संपूर्ण जिल्हा पिंजून काढायचा म्हणजे वेळ आणि कष्ट दोन्ही लागणार. साहेब ठाण्याचे, राज्याचे परिवहन मंत्री, त्यांना एवढा वेळ कुठून असणार? मग त्यांनी एक ‘स्मार्ट’ मार्ग काढला. विमानतळाच्या  अगदी कुंपणाला लागून असलेल्या खेड गावात साहेब शिरले. काही मिनिटांतच त्यांनी या एका गावातून संपूर्ण जिल्ह्याच्या दुष्काळाचे ‘स्कॅनिंग’ केले! याला म्हणतात डिजिटल इंडियाचा खरा ‘फास्ट ट्रॅक’ दौरा. ‘उदाव्याभोवती गवऱ्या वेचायच्या’ आणि मोकळं व्हायचं, असा हा सगळा थाट!

नुसतं शेतात उभं राहून कसं चालेल? माध्यमांना काहीतरी ‘ब्रेकिंग’ दिलं पाहिजे ना! मग साहेबांनी थेट खिशातून मोबाईल काढला आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना व्हिडिओ कॉल लावला. फोन थेट शेतकऱ्याच्या हातात!

शेतकरी बिचारा पोटतिडकीने म्हणाला, “साहेब, परिस्थिती लय भीषण आहे!” तिकडून उपमुख्यमंत्र्यांची रेकॉर्डेड कॅसेट वाजल्यासारखा ठरलेला डायलॉग आला, “सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही… ५ ऑक्टोबरपासून पंचनामे सुरू होतील!” यावर शेजारी उभ्या असलेल्या सरनाईकांनीही ‘साहेब, जिल्ह्यात हीच परिस्थिती आहे’ अशी री ओढली. सोबत असलेले खासदार ओमराजे निंबाळकरही म्हणाले, “साहेब, मी फिरतोय, परिस्थिती खरंच गंभीर आहे.”

आता इथं शेतकरी मनातल्या मनात कपाळावर हात मारून घेत होता. पीक आज करपलंय आणि सरकारचे पंचनामे ५ ऑक्टोबरला सुरू होणार? म्हणजे काय पंचांग बघून, मुहूर्त काढून पंचनामे करणार आहात का? तोपर्यंत करपलेलं पीक काय ‘फ्रीझर’मध्ये ठेवायचं का? सरकार वाऱ्यावर सोडणार नाही म्हणतंय, पण इथं दुष्काळाने आधीच सगळं वाऱ्यावर उडवून लावलंय, त्याचं काय?

एकंदरीत काय, तर खासदार ओमराजे इकडे गावन् गाव फिरतायत, आणि आपले झेंडा मंत्री मात्र उंटावरून… माफ करा, ‘विमानातून’ शेळ्या हाकतायत. कॅमेऱ्यासमोर दोन-चार डायलॉग मारले, व्हिडिओ कॉलवर हजेरी लावली आणि काही मिनिटांतच साहेब विमानाने पुन्हा आपल्या ठाण्याकडे रवाना झाले.

आता धाराशिवचा दुष्काळ आणि करपलेलं सोयाबीन पुन्हा एकदा साहेबांची आणि पुढच्या ‘झेंडावंदना’ची वाट बघत उभं आहे!

Previous Post

उमरगा : सामाजिक वनीकरण कार्यालयात घुसून वनरक्षकाच्या अंगावर ओतली काळी शाई; शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

Next Post

‘मराठवाड्याची शिवकाशी’ तेरखेड्यातील फटाका उद्योग संशयाच्या भोवऱ्यात!

Next Post
तेरखेडा फटाका उद्योगाला दणका; ‘भवानी फायर वर्क्स’चे उत्पादन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशापर्यंत बंद!

‘मराठवाड्याची शिवकाशी’ तेरखेड्यातील फटाका उद्योग संशयाच्या भोवऱ्यात!

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरग्यात विनापरवाना लोखंडी कोयता बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल

November 1, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

नंदगाव शिवारात २४ एकर सोयाबीनच्या बनीमला आग; शेतकऱ्याचे ११ लाखांचे नुकसान

November 1, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

परंड्यात ४२ कामगारांना डांबून ठेवून १६ ते १७ तास काम; मारहाण, धमकी देत मोबदला न दिल्याचा आरोप

November 1, 2026
धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

धाराशिव जिल्ह्यात गुटखाविरोधात पोलिसांची कारवाई; कळंब, ढोकी, मुरुममध्ये ५० हजारांहून अधिकचा मुद्देमाल जप्त

November 1, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

नळदुर्गमध्ये गोवंशीय मांसाची वाहतूक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

October 31, 2026

Recent Posts

  • उमरग्यात विनापरवाना लोखंडी कोयता बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल
  • नंदगाव शिवारात २४ एकर सोयाबीनच्या बनीमला आग; शेतकऱ्याचे ११ लाखांचे नुकसान
  • परंड्यात ४२ कामगारांना डांबून ठेवून १६ ते १७ तास काम; मारहाण, धमकी देत मोबदला न दिल्याचा आरोप
  • धाराशिव जिल्ह्यात गुटखाविरोधात पोलिसांची कारवाई; कळंब, ढोकी, मुरुममध्ये ५० हजारांहून अधिकचा मुद्देमाल जप्त
  • नळदुर्गमध्ये गोवंशीय मांसाची वाहतूक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!